डिस्ने वर्ल्डमधील वंडर वुमनने आनंदाची बातमी शेअर केली आहे. ३८ वर्षीय गॅल गॅडोट पुन्हा एकदा आई झाली आहे. अभिनेत्रीने एका मुलीला जन्म दिला आहे. याबाबतची आनंदाची बातमी स्वत: गॅल गॅडोटने तिच्या चाहत्यांसह शेअर केली आहे. गॅल गॅडोटने नुकतीच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. यावेळी अभिनेत्रीने तिचा हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बाळाला आपल्या मांडीवर घेऊन बाळाला किस घेताना दिसत आहे. (Gal gadot Welcomes Her 4th baby)
हा सुंदर फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझ्या लाडक्या लेकीचं स्वागत आहे. ही गर्भधारणा सोप्पी नव्हती पण त्यावर मात करत मी बाळाला जन्म दिला आहे. बाळा तू आमच्या आयुष्यात उज्ज्वल प्रकाश घेऊन आली आहेस. तुझ्या येण्याने माझं हृदय प्रेम व आपुलकीने भरलेले आहे. तुझं आपल्या या घरात स्वागत आहे. बाबा पण खूप खुश आहे”.
आणखी वाचा – नातेवाईकांच्या लग्नात नाचताना धर्मेंद्र यांना दुखापत, पायालाही मार, तिथे नेमकं काय घडलं?
अभिनेत्रीने लेक झाल्याची गोड बातमी देण्याबरोबरच तिने तिच्या मुलीचे नावही उघड केले आहे. तिने बाळाचे नाव ओरी असे ठेवले आहे. ओरी म्हणजेच ‘माय लाईट’. अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंटचा वर्षाव करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांबरोबरच अनेक कलाकार मंडळींनीही त्यांच्या या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
अभिनेत्री गॅल गॅडोट ही चौथ्यांदा आई झाली आहे. या आधी तिला तीन मुली आहेत. २०११ मध्ये, अभिनेत्रीने तिची पहिली मुलगी अल्माला जन्म दिला. यानंतर २०१७ मध्ये त्यांची दुसरी मुलगी मायाचा जन्म झाला. २०२१ मध्ये, गॅल गॅडोटने तिची तिसरी मुलगी डॅनिएलाचे स्वागत केले. यानंतर आता अभिनेत्रीने तिच्या चौथ्या मुलीला जन्म दिला आहे. गॅल गॅडोटने २००८ मध्ये जारोन वर्सानोशी लग्न केले. गॅल गॅडॉट ही एक प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री आहे. भारतात अभिनेत्रीला ‘वंडर वुमन’ म्हणून ओळखले जाते.