छोट्या पडद्यावरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेचं हटके कथानक प्रेक्षकांना भावलं असल्यांन ही मालिका नेहमी टीआरपीमध्ये पहिल्या स्थानकावर असल्याचं दिसते. या मालिकेतील दीपा आणि कार्तिक यांची जोडी आणि चिमुकल्या कार्तिकी आणि दीपिका यांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली. अश्यातच या मालिकेचं कथानक १४ वर्ष पुढे गेलंअसून या मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय.(New entry Rang maza vegla)
रंग माझा वेगळा या मालिकेचं बदललेलं कथानक हे प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसतंय साक्षीच्या खुनाचा आरोप हा कार्तिकवर आला आणि त्याला कोर्टाने १४ वर्षाचा तुरुंगवास सुनावला. मालिकेत दाखवण्यात आल्याप्रमाणे १४ वर्षानंतर कार्तिक तुरुंगातून बाहेर आला आहे. कार्तिक घरी आल्या नंतर वातावरण काहीस बदललेलं दिसत आहे. मोठ्या झालेल्या दोन्ही मुली ज्या आईच्या सोयाबीत आणि आईच्या विरोधात पाहायला मिळत आहे. अशातच मालिका कोणतं नवीन वळण घेणारे हे पाहून रंजक ठरणार आहे.
====
हे देखील वाचा –मराठी अभिनेत्रीकडे अश्लील व्हिडिओची मागणी अभिनेत्रीने शिकवला चांगलाच धडा
====
सुख म्हणजे नक्की काय असत मधील जयदीपच्या सख्ख्या भावाची मालिकेत एन्ट्री(New entry Rang maza vegla)
मालिकेच्या नव्या कथेत कार्तिकी आणि दीपिका या दोघी एकमेकींसोबत असल्या तरीही कार्तिकी ही कार्तिकच्या बाजूने असून कार्तिक प्रमाणे तिलाही दीपाचा प्रचंड राग असल्याचं दिसत आहे. तर श्वेताच्या टीम मध्ये आता कार्तिक आणि ओघाने कार्तिकीचा सुद्दा समावेश झाला असून दीपा ला नव्या संकटाना समोर जावं लागणार असल्याचं दिसत आहे. मालिकेत नव्याने आलेल्या या दोन पात्रांमध्ये अजून एका नव्या पात्राची एन्ट्री झाल्याचं चित्र सध्या दिसत आहे. किर्तिकीच्या मित्राची भूमिका साकारण्यासाठी मालिकेत अभिनेता मेघन जाधवची एन्ट्री दाखवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे मेघन हा स्टार प्रवाह वरील सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेतील जयदीप हे पात्र साकारणाऱ्या अभिनेता मंदार जाधवचा भाऊ आहे. आर्यन हे मेघन साकारत असेलेल्या पात्रच नाव असून दीपिकाच्या मित्राची भूमिका तो पार पाडणार आहे. तर कार्तिकीच्या सोबत दीपाला त्रास देण्यात आर्यन ही सहभागी होणार का? कार्तिकीला कशाप्रकारे आर्यनची मदत होणार? हें पाहणं रंजक ठरणार आहे. या संदर्भात एक प्रोमो कार्तिकीच पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री अनुष्काच्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून पोस्ट करण्यात आला आहे.