हल्ली छत्रपती शिवाजी महाराज आणि इतिहासातील शूर योद्धे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांचा सगळीकडे बोलबाला दिसत आहे. अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत तर काही ठिकाणी इतिहासाची झालेली प्रतारणा पाहून प्रेक्षक, इतिहासप्रेमींचा राग अनावर होत आहे. काही मंहिनांपुर्वी इतिहासावर आधारित चित्रपटांच्या यादीत महेश मांजरेकर दिगदर्शित ‘ वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. आधी सत्या मांजरेकर साकारत असलेलं पात्र प्रेक्षकांच्या नापसंतीस पडलं तर नंतर अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराज ही भूमिका साकारणार ही देखील प्रेक्षकांना फारसं आवडलेलं दिसलं नाही.(Satya Manjrekar controversy)
म्हणून झालेली कॉंट्रोव्हर्सी(Satya Manjrekar controversy)
महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात हा चित्रपट त्याच्या पहिल्या लूक पासूनच चर्चेत राहिला, अक्षय कुमार या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार हे कळताच काही प्रेक्षक उत्सुक तर झालेच पण काहींना मात्र हे कास्टिंग काही पटलं नाही,तर दुसरीकडे ITSMAJJA ने घेतलेल्या मुलाखतीत प्रेक्षकांना सत्या मांजरेकर मावळा म्हणून काही पटला नाही,अनेक स्तरांवरील लोकांनी या चित्रपटावर आक्षेप दर्शविला.
![(Satya Manjrekar controversy)](https://marathi.itsmajja.com/wp-content/uploads/2023/03/दुनिया-डोक्यावर-घेणार-हाय-रं....-2023-03-17T151619.450-1024x546.png)
या चित्रपटात अक्षय कुमार सोबतच प्रवीण तरडे,जय दुधाने,विशाल निकम,हार्दिक जोशी,विराट मडके,उत्कर्ष शिंदे आणि सत्या मांजरेकर हे सात मावळे प्रेक्षकांसमोर आले. परंतु सत्या मांजरेकर वर झालेल्या प्रचंड ट्रोलिंग मुळे त्याला चित्रपटातून वगळण्यात आले आहे का.? असा प्रश्न उपस्थित राहतोय. नुकतच अभिनेता आरोह वेलणकर ने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ एका जिम मधला आहे, प्रवीण तरडे व्यायाम करत असताना.
जय,विशाल,हार्दिक,विराट आणि उकर्ष त्यांना प्रोत्साहन देत आहेत, Team work at its best असं कॅपशन देखील त्याने या व्हिडिओ ला दिले आहे, परंतु या सगळ्या व्हिडिओ मध्ये सत्या मांजरेकर कुठेच दिसत नसल्याने त्याच्या जागेवर आता आरोह वेलणकर ची वर्णी लागली आहे का अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाची कथा पराग कुलकर्णी यांची असून पटकथा महेश मांजरेकर, पराग कुलकर्णी यांची आहे. संवाद संजय पवार यांनी लिहिले आहेत. संकलन मनीष मोरे तर छायांकन अभिमन्यू डांगे यांचे आहे. कलादिग्दर्शन प्रशांत राणे यांचे असणार आहे. संगीत आणि पार्श्वसंगीत हितेश मोडक यांचे आहे. साहस दृश्ये प्रद्युमन कुमार स्वान यांची आहेत. उमेश शिंदे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.(Satya Manjrekar controversy)
=====
हे देखील वाचा –मराठी अभिनेत्रीकडे अश्लील व्हिडिओची मागणी अभिनेत्रीने शिकवला चांगलाच धडा
=====
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाचा थरार रुपेरी पडद्यावर पहाण्यासाठी आपल्याला २०२३च्या दिवाळीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे