रुपेरी पडदा असो व रंगमंच संकर्षणच्या अभिनयाचं पारडं नेहमी जड असतं. अभिनयासोबतच एखाद्या विषयावर तेवढच परखड मत असणं ते जगासमोर मांडणं हे ही कसब संकर्षणला चांगलंच अवगत आहे. संकर्षण परभणीहून मुंबईत आला आणि त्याच्या संघर्षाला सुरुवात झाली अनेक नाटकं, एकांकिका, चित्रपट, मालिका या घटकांमध्ये अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. तू म्हणशील तसं हे संकर्षण चं नाटक तुफान प्रतिसादात सुरु आहे, प्रेक्षक नेहमीच नाटक संपल्यावर संकर्षणाला भेटायला येतात त्याच कौतुक करतात,संकर्षण नेहमीच त्याचे अनुभव इंस्टाग्रामवर पोस्ट करत असतो. असाच एक अनोखा अनुभव त्याला ‘तू म्हणशील तसं’ या नाटका दरम्यान आला आहे आणि याबाबत त्याने एक पोस्ट करत छान कॅप्शन लिहीत माहिती दिली आहे.(Sankarshan Karhade fan moment)
पोस्ट मध्ये संकर्षण ने लिहिले आहे म्हणुन “रसिक प्रेक्षक माय बाप आहेत..” ????????❤️
आज #तूम्हणशीलतसं चा ३०० वा प्रयोग पार पडला.. प्रेयोगानंतर एक काका काकु आले मला म्हणाले ,
“आम्ही , अशोक सराफ , लक्ष्मीकांत बेर्डे , प्रशांत दामले ह्या सगळ्यांची नाटकं पाहात आलोय.. त्यांची कामं पाहातांना सकारात्मक उर्जा जाणवायची , जाणवते.. तीच उर्जा तुझ्या कामांत आणि प्रेजेन्स मध्ये आहे.. ति टिकवून ठेव.. आणि खाउ साठी हे ५०० रूपये घे..”
मी घेत नव्हतो.. पण त्यांचा आग्रह मी मोडला नाही..
आई बाबा खाउ साठी पैसे देतात , तसेच ४०० रुपयांचं तिकिट काढून परत वेगळे खाउ चे ५०० रुपये द्यावे वाटणं ही फार मोठी गोष्टं आहे.…सोबतच मोठ्या मनाने दिलेली दाद आहेच.. म्हणुन तुम्ही “माय बापच” आहात.. ????????????
अशाच शुभेच्छा कायम ठेवा..’

प्रेक्षकां कडून मिळणारा असा प्रतिसाद म्हणा किंवा आशीर्वाद एका कलाकाराला, लेखकाला नेहमीच पुढील वाटचालीसाठी बळ देत असतो. या अनुभवातून संकर्षणला देखील असच बळ मिळालं असेल एवढं नक्की. या अनुभवत जेव्हा एखादा प्रेक्षक मनापासून खाऊसाठी ५०० रुपये देतो तेव्हा या ५०० रुपयांची पैशातील किंमत या पेक्षा अधिक त्यामागच्या भावनांची किंमत ही कधीही सरस ठरते.
=====
हे देखील वाचा –3 Idiots मधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाच्या प्रयोगाला हजेरी
=====
म्हणून प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरतो संकर्षण(Sankarshan Karhade fan moment)
माध्यम कोणतंही असो,संकर्षण करतो त्या कामाचं नेहमीच प्रेक्षक नेहमी कौतुक करतात. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतून समीर या संकर्षण ने साकारलेल्या पात्राला चाहत्यांनी चांगलंच प्रेम दिलं. सोबतच संकर्षणच्या ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाचे ही प्रयोग अगदी दणक्यात सुरु आहेत.तर तू म्हणशील तस या नाटकानंतर संकर्षण लिखित निमय क अटीं लागू हे नाटक आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकच दिगदर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केलं असून निर्मिती प्रशांत दामले यांनी केली आहे. तर नाटकात संकर्षण सोबत अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद बर्वे हे कलाकार देखील दिसणार आहेत. रंगभूमीवर लागू होणाऱ्या या ‘नियम व अटींना’ प्रेक्षक कशी दाद देतील हे पाहणं रंजक ठरणार आहे.