सिनेसृष्टीत मराठमोळ्या व प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रींच्या लग्नाची विशेष चर्चा रंगली. ही अभिनेत्री म्हणजे कलरफुल अशी ओळख असलेली पूजा सावंत. पूजाने आजवर तिच्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. अभिनयासह पूजाने तिच्या नृत्यानेही रसिक प्रेक्षकांची मन जिंकली आहे. शिवाय तिच्या मोहक सौंदर्याचे तर लाखो दिवाने चाहते आहेत. अशी ही सर्वांची लाडकी पूजा अखेर लग्नबंधनात अडकली आहे. पूजाने सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधली आहे. पूजा व सिद्धेश यांच्या शाही विवाहसोहळ्याचे अनेक फोटो समोर आले. अगदी बॉलिवूड स्टाईलने लग्नसोहळा उरकत ही जोडी विशेष चर्चेत राहिली. (Pooja Sawant Siddhesh Chavan)
पूजा व सिद्धेशच्या लग्नाच्या अनेक चर्चा रंगल्या. हळदी, संगीत, मेहंदी सोहळ्यातील धमाल, मस्तीचे व्हिडीओ समोर आले. जवळचे नातेवाईक, कुटुंबीय व कलाकार मंडळींच्या उपस्थितीत पूजा व सिद्धेश लग्नबंधनात अडकले. अगदी शाही थाटामाटात पूजा व सिद्धेश यांचं लग्न पार पडलं. दोघांच्या लग्नातील लूकनेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पूजा व सिद्धेशने वरमाला घालताना पारंपरिक पेहराव परिधान केला होता. तर रिसेप्शनसाठी दोघांचा पारंपरिक व मॉडर्न टच लक्षवेधी ठरला.

इतकंच नव्हे तर दोघांच्या लग्नापुर्वीच्या विधींमधील लूकही चर्चेत राहिले. लग्नानंतर पूजाच्या सासरच्या घरी सत्यनारायची पूजा झाली. यावेळीही हे नववधूवर पारंपरिक अंदाजात पाहायला मिळालं. दरम्यान, पूजाच्या सासरच्या घराचीही यावेळी झलक पाहायला मिळाली. पूजा लग्नानंतर तिच्या सासरी रमलेली पाहायला मिळत आहे. लग्नानंतर दोघांनीही मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतले. त्यांच्या सासरला सुरुवात करण्याआधी जोडीने गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला. दोघांचा हा मंदिरातील आवारातील फोटो पूजाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
पूजाने शेअर केलेल्या या फोटो दोघेही नववधूवर जोडपं खूपच खुश दिसत आहे. पारंपरिक अंदाजात त्यांनी मंदिरात दर्शन घेतले. यावेळी नव्या नवरीचं सौंदर्य अधिकचं खुलून आलं होतं. पूजाच्या गळ्यातील मंगळसूत्राची जोरदार चर्चा रंगली. पूजाच्या गळ्यात असणाऱ्या काळ्या मण्यांचा व विशिष्ट डिझाइनचं पेंडंट असणार हे मंगळसूत्र साऱ्यांच्या पसंतीस पडलं. तर कानात झुमके व हातात चुडा घातलेली पूजा खूपच सुंदर दिसत आहे.