लहान पडद्यावरील गाजलेली अभिनेत्री दीपिका कक्कर सतत चर्चेत असते. ती अभिनयापासून दूर असली तरीही सोशल मीडियाच्या नेहमी प्रेक्षकांच्या संपर्कात असते. ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून ‘सिमर’च्या भूमिकेत प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. या मालिकेने अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यानंतर दीपिका ‘कहा हम कहा तुम’ या मालिकेतूनही समोर आली होती. पण ती चर्चेत आली ती सह-कलाकार शोएब इब्राहीमबरोबर लग्नबंधनात अडकल्यामुळे. दीपिकाचे ही दुसरे लग्न असून तिला एक मुलगाही आहे. (Dipika kakar and shoaib Ibrahim lovestory)
‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून दीपिका व शोएब ही जोडी प्रथम प्रेक्षकांसमोर आली. या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. मालिका संपल्यानंतर काही वर्षानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण हे दीपिकाचे दुसरे लग्न आहे. दीपिकाने २०१३ साली रौनक सॅमसनबरोबर लग्न केले. तो पायलट होता. पण लग्न झाल्यानंतर काही महिन्यातच दोघांमध्ये वाद होऊ लागले. त्यामुळे ही नाते संपविण्याचा निर्णय दीपिकाने घेतला. २०१५ मध्ये दीपिका व रौनक घटस्फोट घेऊन विभक्त झाले.
यावेळी ती खूप कठीण परिस्थितिमधून जात होती. त्यावेळी शोएबने तिला आधार दिला. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांतर दोघेही ‘नच बालिये’च्या शोमध्ये एकत्रित सहभागी झाले होते. तेव्हा शोएबने सर्वांसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. नंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर दीपिकाने मुस्लिम धर्म स्वीकारला. त्यानंतर तिने स्वतःचे नाव ‘फैजा’ ठेवले. दोघंही सध्या आनंदाचे आयुष्य व्यतीत करत आहेत. शोएब नेहमी तिला सुखात ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो. दोघांनाही ‘रुहान’ नावाचा एक मुलगा आहे.
रुहानच्या जन्माआधी दीपिकाचा एकदा गर्भपात झाला होता. त्यामुळे दोघांना कठीण परिस्थितिचा सामना करावा लागला होता. त्यामुळे दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या वेळी तीन महिने होईपर्यंत कोणालाही सांगितले नव्हते असे शोएबने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. शोएब नुकताच ‘झलक दिखला जा’च्या ११व्या सीजनमध्ये दिसला होता.