आपल्या उत्तम अभिनयाने कायमच रसिक प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या अभिनेत्रीच्या यादीत एका अभिनेत्रीच नाव आवर्जून घेतलं जात ती म्हणजे रिंकू राजगुरू. सिनेसृष्टीत कुणीही वारसा नसताना रिंकूने तिला मिळालेल्या संधीच सोनं करत सिनेसृष्टीत छाप पाडली. सैराट या चित्रपटामुळे रिंकूला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील रिंकूच्या आर्ची या भूमिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. रिंकू आज संपूर्ण महाराष्ट्रात घराघरांत पोहोचली असून तिचे लाखो दिवाने चाहते आहेत. सोशल मीडियावरुन अभिनेत्री नेहमीच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. (Rinku Rajguru Angry)
अभिनयाशिवाय रिंकू अनेकदा मोठमोठ्या कार्यक्रमांना उपस्थित असलेली पाहायला मिळाली आहे. चाहत्यांच्या प्रेमापोटी ती नेहमीच कार्यक्रमांना हजेरी लावत भेट देत असते. चाहतेही रिंकूच्या भेटीसाठी नेहमीच उत्सुक असतात. तिच्यासह फोटो काढायला मिळायला हवा म्हणून चाहतेही तिच्याभोवती घोळका करताना दिसतात. अशातच रिंकूने नुकतीच जळगांव येथे महासांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला अभिनेत्रीला प्रमुख पाहुणी म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं.

या कार्यक्रमादरम्यान, रिंकूला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती. दरम्यान या गर्दीचा फटका अभिनेत्रीला बसला असल्याचं समोर आलं आहे. या कार्यक्रमादरम्यान, रिंकूच्या भेटीसाठी चाहत्यांनी गर्दी केली असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यानचा एक व्हिडीओ ‘एबीपी माझा’च्या युट्युब चॅनेलवरुन पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये रिंकू तिच्या चाहत्यांवर भडकलेली पाहायला मिळत आहे. रिंकूला पाहण्यासाठी, तिच्यासह सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांनी अभिनेत्रीच्या आजूबाजूला गर्दी केलेली पाहायला मिळाली.
अभिनेत्री कार्यक्रमातून बाहेर येत असताना जमलेल्या घोळक्याने रिंकूला धक्क्काबुक्की करण्यात आली. हे पाहताच अभिनेत्री संतापलेली पाहायला मिळाली. ‘या जागी जर तुमची मुलगी असती तर चाललं असतं का?’, असा थेट सवाल अभिनेत्रीने त्या गर्दीतच चाहत्यांना केला. रिंकूचा हा चाहत्यांवर चिडलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. रिंकूने सिनेसृष्टीत तिच्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. त्यामुळे तिचा खूप मोठा फॅन-फॉलोविंग असल्याचं पाहायला मिळतंय. पण चाहत्यांची यावेळची ही वागणूक रिंकूला मुळीच पटलेली नाही आहे.