सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच मालिकाविश्वातील एका अभिनेत्रीच्या लग्नाची बातमी समोर आली आहे. अभिनेत्री सुरभी चंदनाने तिचा बॉयफ्रेंड करण शर्मासह लग्नगाठ बांधली आहे. जवळपास १३ वर्षे सुरभी व करण रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर सप्टेंबर २०२३मध्ये त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरभी व करण यांचा जयपूर, राजस्थान येथे शाही विवाहसोहळा संपन्न झाला आहे. गेल्या काही काळापासून त्यांच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे फोटो समोर येत होते. (Surbhi Chandana Wedding)
सोशल मीडियावर सुरभी व करण यांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. यादरम्यान नववधू सुरभी चंदनाची खास झलक दिसली. रॉयल एंट्री घेतानाचा तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतं आहे. व्हिडीओमध्ये दोन्ही बाजू पांढऱ्या फुलांनी सजवलेले डेकोरेशन लक्ष वेधून घेत आहे. फिकट गुलाब रंगाच्या व सिल्व्हर कलरच्या लेहेंग्यात अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. लग्नासाठी जात असताना तिचा नवरा तिला पुढे घ्यायला आलेला दिसतोय.
The phere are doneee????????????????
— ✿ Sre 。・. | team SuKar! ???????? (@SnoozySreya) March 2, 2024
Mr and Mrs Sharma finally!! ????✨
.
.#SuKarDaVyaah #SurbhiChandna #KaranSharma #SuKar pic.twitter.com/c6EEhI47QW
सुरभी व करण दोघेही सप्तपदी घेत लग्नबंधनात अडकले आहेत. यावेळी दोघांच्या जवळचे कुटुंब व मित्र-परिवार उपस्थित होता. गुलाबी रंगाच्या लांब ओढणीमध्ये सुरभीचा ब्राइडल लूक खूप खास दिसला. केस मोकळे ठेवून तिने हलकासा मेकअप केला आहे. स्टेटमेंट चोकर, मॅचिंग सिंदूर, पांढरा चुडा व गोल्डन कलिरे याने नववधूचा लूक पूर्ण झाला. तर दुसरीकडे, करणने हस्तिदंती रंगाची शेरवानी घातली होती, या लूकमध्ये करणही उठून दिसला.
लग्नापूर्वीच्या काही दिवसांआधीपासून सुरभी चंदनाचे तिच्या लग्नापुर्वीच्या समारंभातील सुंदर फोटो शेअर केले होते. सुरभी व करण दोघांनीही मिळून त्यांच्या लग्नाची तयारी केली. डेस्टिनेशन वेडिंगची संपूर्ण जबाबदारी दोघांनी घेत यांत प्रत्यक्षदर्शी स्वतः पाहणी केली. साध्या सुरभी व करण यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले असून कलाकार व चाहत्यांनी त्यांच्या या फोटो, व्हिडीओवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.