सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असताना कलरफुल अभिनेत्री पूजा सावंत लग्नबंधनात अडकली आहे. पूजाने सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधत तिच्या आयुष्यातील नव्या प्रवासास सुरुवात केली आहे. पूजा व सिद्धेशच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. अगदी बॉलिवूड स्टाईलने केलेल्या पूजाच्या रिसेप्शन सोहळ्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तर मराठमोळ्या पद्धतीने पार पडलेल्या लग्नातील विधिदरम्यानचे अनेक फोटो, व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहेत. पूजाच्या लग्नाचीचं नाही तर तिच्या साखरपुड्याची, हळदीची, मेहंदी व संगीतचीही जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. (Prarthana Behere Story)
पूजा व सिद्धेश यांच्या लग्नात कलाकार मंडळींची धामधूम पाहायला मिळाली. दरम्यान, पूजाची मैत्रीण व लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने देवल हजेरी लावली होती. इतकंच नव्हेतर प्रार्थना पूजाबरोबर तिच्या लग्नाच्या तयारीपासून तिच्यासह होती. शिवाय हळदी, संगीत, मेहंदी या कार्यक्रमातही प्रार्थना हजेरी लावत पुढाकार घेताना दिसली. मैत्रीण म्हणून तिने पूजाच्या लग्नात तिची बरीच मेहनतही केलेली पाहायला मिळाली. प्रार्थना पूजाच्या लग्नात करवली म्हणून मिळवताना दिसली.

प्रार्थनाने पूजाच्या लग्नात तिचा पती अभिषेक जावकरसह हजेरी लावली होती. पूजा व सिद्धेशची लग्नगाठही प्रार्थनाने बांधली, यावेळी तिचा नवराही तिच्याबरोबर होता. पूजा व सिद्धेशची लग्नगाठ बांधतानाचा एक सुंदर फोटो प्रार्थनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरुन पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देत, “नाती जन्मोजन्मीची, परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेमभरल्या रेशीमगाठीत बांधलेली” असं म्हणत हा गोड फोटो शेअर केला आहे.
प्रार्थना व अभिषेक यांचा पूजाच्या लग्नातील पारंपरिक व मॉडर्न असा दुहेरी अंदाज विशेष भावला. शिवाय प्रार्थनाने पूजाच्या प्रत्येक फंक्शनला हटके लूक केल्याचंही पाहायला मिळालं होतं. काही दिवसांपूर्वी पूजाची ब्राईड टू बी पार्टी गोव्यात साजरी करण्यात आली. यावेळीही प्रार्थना व तिचा नवरा अभिषेकने पुढाकार घेतलेला पाहायला मिळाला. त्यांचे फोटो सोशल मीडियावरुन शेअरही करण्यात आले होते.