शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अंबानी कुटुंबाची गोष्टच न्यारी! लेकाच्या प्री-वेडिंगला पॉपस्टार रिहानाच्या परफॉर्मन्ससाठी मोजले तब्बल इतके कोटी रुपये

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 1, 2024 | 10:58 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Ambani family pre-wedding functions

अंबानी कुटुंबाची गोष्टच न्यारी! लेकाच्या प्री-वेडिंगला पॉपस्टार रिहानाच्या परफॉर्मन्ससाठी मोजले तब्बल इतके कोटी रुपये

भारतातील करोडपती मुकेश अंबानी यांच्या घरी सध्या लग्नाची लगबग सुरू आहे. जामनगर येथे आजपासून लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरवात झाली आहे. या कार्यक्रमासाठी जगभरातील विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. राधिका मर्चंट व अनंत अंबानी दोघेही १२ जुलै रोजी लग्नबंधनात  अडकणार आहेत. वधू-वरांना आशिर्वाद देण्यासाठी बॉलिवूड, हॉलिवूड व इतर क्षेत्रातील मान्यवार हजर राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी ‘ग्रॅमी पुरस्कार’ विजेती हॉलिवूड गायिका रिहाना जामनगर येथे रिहाना गुरुवारी तिचा पार्टनर रॉकीसह दाखल झाली. या तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमासाठी विविध थीमचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमामध्ये रिहाना तिच्या काही गाण्यांचे सादरीकरण करणार आहे. (Ambani family pre-wedding functions)

नुकतेच सोशल मीडियावर रिहानाच्या रीहर्सलचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आपल्या शोमध्ये लागणाऱ्या सर्व सामानासह रिहाना भारतात दाखल झाली होती. पण या सादरीकरणासाठी मुकेश अंबानी यांनी किती पैसे मोजले आहेत हे माहीत आहे का? आपल्या लाडक्या लहान मुलाच्या लग्नासाठी अंबानी कोणतीही कसर सोडत नाही आहेत. रिहानाच्या लाईव्ह परफॉर्मन्ससाठी तब्बल ५ मिलियन डॉलर्स म्हणजे ४१ कोटी ४२ लाख ६५ हजार रुपये मोजले आहेत. ही रक्कम रिहानाला तीन दिवस परफॉर्म करण्यासाठी मिळाली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

आणखी वाचा – ‘रसोडे में कौन था?’ फेम यशराज मुखाटेचा विवाहसोहळा संपन्न, नोंदणी पद्धतीने केलं लग्न, सोशल मीडियावरुन शुभेच्छांचा वर्षाव

View this post on Instagram

A post shared by Radhika Merchant ✨ (@radhika.merchant_)

अनंत व राधिकाच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमासाठी गुजरात येथील जामनगरची निवड करण्यात आली. या ठिकाणी अंबानी कुटुंबाने १४ मंदिरेही बांधली आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, रणवीर सिंह, आलिया भट्ट, रणबीर कपूर, जान्हवी कपूर, करण जोहर हे उपस्थित राहणार आहेत.

आणखी वाचा – बॉलिवूडच्या गर्दीत ठाकरे परिवाराची रॉयल एंट्री; अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगसाठी उद्धव ठाकरे पत्नी, मुलासह जामनगरला पोहोचले अन्…

कार्यक्रमांना आज सुरवात झाली असून आजची थीम ‘अॅन इव्हिनिंग इन एव्हरलँड’ अशी आहे. यामध्ये ‘एलिगंट कॉकटेल’ हा ड्रेसकोड असून यादिवशी संगीत, नृत्य व इतर काही विशेष परफॉर्मन्सचा समावेश असणार आहे. रिहानादेखील आज परफॉर्म करणार आहे.

Tags: anant ambaniHollywood celebrityinternational pop singerpopstarradhika merchantrehana singer
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Pooja Sawant Sister

सावंत सिस्टर्सची गोष्टच न्यारी! पूजा सावंतची सासरी पाठवणी केल्यानंतर बहिणीला करमेना, पोस्ट शेअर करत म्हणाली…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.