बॉलिवूड सिनेसृष्टीतील लोकप्रिय व नेहमीच चर्चेत असणाऱ्या कपलपैकी एक कपल म्हणजे अभिनेता रणवीर सिंह व अभिनेत्री दीपिका पादुकोण. दीपिका व रणवीर कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून दीपिका पादुकोण हिच्या प्रेग्नेंसीची चर्चा सर्वत्र रंगली होती. मात्र अधिकृतरीत्या दीपिका व रणवीर यांनी याबाबतची कोणतीच घोषणा केली नव्हती. त्यामुळे या चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळालं. यानंतर आता दीपिका व रणवीर यांच्या इंस्टाग्राम पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. (Deepika Padukone And Ranveer Singh Goodnews)
दीपिका व रणवीर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. लवकरच दोघे आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी त्यांनी चाहत्यांसह शेअर केली आहे. दरम्यान, त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये सप्टेंबर २०२४मध्ये बाळाला जन्म देणार असल्याचं समजत आहे. दोघांची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल झाली असून सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. तसेच अनेक कलाकार मंडळींनी या पोस्टवर कमेंट करत दोघांचं अभिनंदन केलं आहे.
रणवीर व दीपिका यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मोठ्या थाटामाटात रणवीर व दीपिका यांनी लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. दीपिका व रणवीर यांच्यातील बॉण्डिंग नेहमीच साऱ्यांच्या पसंतीस पडत. अनेक कार्यक्रमांमध्ये देखील रणवीर व दीपिका एकमेकांबद्दल सांगत असतात. बऱ्याच चित्रपटांमध्ये ही जोडी एकत्र पाहायला मिळाली. लग्नानंतर दीपिकाने तिच्या करिअरकडे अजिबात दुर्लक्ष केलं नाही.
आता लग्नाला पाच वर्ष पूर्ण होताच दोघांनी त्यांच्या आयुष्याच्या वाटेवरील एक पाऊल पुढे टाकले आहे. दोघांनी आई-बाबा होणार असल्याचा निर्णय घेतला असून येत्या सप्टेंबर महिन्यात ते गोंडस बाळाला जन्म देणार आहेत. एका मुलाखतीत दीपिकाला जेव्हा पालक बनण्याबद्दल विचारले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हास्य होते. याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली होती की, “नक्कीच. रणवीर व मला लहान मुले आवडतात. आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहोत जेव्हा आम्ही आमचं स्वतःचं कुटुंब सुरू करू”.