हॉलिवूड स्टार टॉम क्रूझबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. वयाच्या ६१व्या वर्षी मिशन: इम्पॉसिबल टॉम क्रूझच्या ब्रेकअपबाबतची अपडेट समोर आली आहे. टॉम क्रूझ व त्याची रशियन गर्लफ्रेंड अलेसिना खैरोवा यांचे ब्रेकअप झालं असल्याचं सांगण्यात येत आहे. टॉम क्रूझने त्याच्या रशियन गर्लफ्रेंडबरोबर असलेले नाते संपवले असल्याचा दावा केला जात आहे. टॉम क्रूझ व अलेसिना दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. १३ फेब्रुवारी रोजी, अभिनेत्याने सोशल मीडियावर अलेसिना खैरोवाबरोबर असलेल्या नात्याची जाहीर कबुली दिली. आणि या घोषणेच्या अवघ्या १० दिवसांनी त्यांच्या ब्रेकअपची बातमीही समोर आली. (Tom Cruise BreakUp)
टॉम क्रूझने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन अलेसिना खैरोवाचा फोटोही डिलीट केला आहे. अलेसिना व टॉम क्रूझच्या वयात तब्बल २५ वर्षांचा फरक आहे. या दोघांच्या नात्यात दुरावा येण्याची अनेक करणे समोर येत आहेत. काही लोक म्हणत आहेत की, टॉम क्रूझने अलेसिना खैरोवाला सोडले आहे. त्यामुळे ती फार दुखावली आहे. तर बरेच लोक यासाठी त्याच्या गर्लफ्रेंडला दोष देत जबाबदार दिसत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून दोघेही लंडनमध्ये एकत्र राहत असल्याच्या बातम्या येत होत्या. यावेळी अभिनेत्याने मुलांचीही भेट घेतली. या भेटीनंतरच टॉम क्रूझने अलेसिनापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
‘द यूएस सन’ या इंग्रजी वेबसाइटनुसार, टॉम क्रूझ व अलेसिना खैरोवा लंडनमध्ये एअर ॲम्ब्युलन्स चॅरिटीच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या गाला डिनर दरम्यान दिसले होते. मात्र यावेळी दोघेही एकत्र आले नाहीत आणि एकत्र स्पॉट झाले नाहीत. त्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना उधाण आलं. मात्र, आतापर्यंत दोघांनीही या वृत्तांवर कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
याआधीही टॉम क्रूझच अनेक मुलींसह अफेअर होतं. त्याच्या नात्यात दुरावा येण्याची ही पहिली वेळ नाही आहे. टॉम क्रूझचे तीन लग्न झाली आहेत. आणि त्याची तीनही लग्ने अयशस्वी झाली आहेत. टॉम क्रूजला या लग्नांमधून तीन मुलेही आहेत.