सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे. मुग्धा व प्रथमेश यांनी ‘आमचं ठरलं’ म्हणत प्रेमाची जाहीर कबुली सोशल मीडियावरुन दिली. त्यानंतर काही दिवसांतच ही जोडी शाही थाटामाटात लग्नबंधनात अडकली. त्यांच्या लग्नामुळे ही जोडी विशेष चर्चेत आलेली पाहायला मिळाली. कलाक्षेत्रातील उपस्थित कलाकारांच्या व जवळच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. (Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate)
लग्नानंतर मुग्धा व प्रथमेश दोघेही संसारात रमलेले पाहायला मिळाले. त्यांच्या गावाकडच्या घरातील अनेक फोटो, व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावरुन शेअरदेखील केले होते. तसेच दोघांनी कामालाही सुरुवात केली असल्याचं पाहायला मिळालं. एकत्र गायनाचे कार्यक्रम करताना या जोडीला पाहणं अनेकांना रंजक ठरलं. सोशल मीडियावर ही जोडी बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच दोघेही त्याचे अपडेट म्हणा वा एकमेकांबाबतचे अपडेट चाहत्यांसह शेअर करताना दिसतात.

अशातच सध्या ही जोडी गायनसेवा करण्यासाठी उत्तरप्रदेशात पोहोचली आहे. सारेगमप लिट्ल चॅम्प्स या लोकप्रिय कार्यक्रमातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या कार्यक्रमापासूनच मुग्धा व प्रथमेश यांचा खूप मोठा फॅन फॉलोविंग आहे. केवळ महाराष्ट्रातचं नव्हे तर संपूर्ण देशभरात दोघांचे चाहते आहेत. अशातच ही जोडी महाराष्ट्राबाहेरच्या प्रेक्षकांना त्यांच्या गाण्यांनी मंत्रमुग्ध करण्यासाठी थेट उत्तरप्रदेशला पोहोचली आहे. तिथून परतीचा प्रवास करत असताना लखनऊ येथे देखील फिरले.
लखनऊ येथे फिरत असताना लखनऊची खासियत असलेल्या सगळ्या खाद्यपदार्थांचा त्यांनी आस्वाद घेतला असल्याचं पाहायला मिळालं. लखनऊची खाद्यसफर करताना त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन तेथील खास पदार्थांचे फोटो शेअर केले आहेत. मुग्धा व प्रथमेश कामासाठी गेलेल्या ठिकाणी कामाबरोबरच एन्जॉय करताना दिसतात. याचे अपडेट दोघेही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअरही करत असतात.