रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अंबानी कुटुंबियांकडे आहेत इतक्या कोटी रुपयांचे दागिने, नीता अंबानींच्या अंगठीची किंमत तब्बल…; होणारी सूनही संपत्तीच्या बाबतीत देते टक्कर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 20, 2024 | 11:53 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Ambani Family Expensive Accessories

अंबानी कुटुंबियांकडे आहेत इतक्या कोटी रुपयांचे दागिने, नीता अंबानींच्या अंगठीची किंमत तब्बल...; होणारी सूनही संपत्तीच्या बाबतीत देते टक्कर

सध्या अंबानी कुटुंबात लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी राधिका मर्चंटसह लग्नबंधनात अडकणार आहे. गुजरातमधील जामनगर येथील रिलायन्स ग्रीन्स येथे १ ते ३ मार्चमध्ये विवाहपूर्वीचे विधी पार पडणार आहेत. अंबानी कुटुंब हे देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे. हे अंबानी कुटुंब अत्यंत सुखी जीवन जगत आहे. संपत्तीच्या बाबतीतही हे कुटुंब अगदी अग्रस्थानी असलेलं पाहायला मिळतं. (Ambani Family Expensive Accessories)

मुकेश अंबानी व नीता अंबानी यांची लाडकी मुलगी ईशा अंबानी हिच्याकडेही अनेक महागडे दागिने आहेत. ईशाकडे असलेल्या एका नेकलेस पीसने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा नेकलेस मल्टी-स्ट्रँड अनकट डायमंड पीस आहे, ज्यामध्ये पन्नासहून अधिक हिऱ्यांचा समावेश आहे. एनएमएसीसी लाँचच्या एका लग्न समारंभात ईशाने पहिल्यांदा हा हिऱ्याचा नेकलेस घातल्याचे बोलले जात आहे. या वैयक्तिक डायमंड नेकलेसची किंमत 20 दशलक्ष रुपयांपेक्षा जास्त म्हणजे सुमारे १६५ कोटी रुपये आहे.

आणखी वाचा – घटस्फोटानंतर लग्नाला पोहोचली ईशा देओल, कॅमेऱ्यासमोर येत प्रतिक्रियाही दिली अन्…; म्हणाली, “मी…”

View this post on Instagram

A post shared by nitaambani (@neeta_ambani07)

नीता अंबानी अनेक मौल्यवान दागिने व ॲक्सेसरीजच्या मालक आहेत. नीता यांच्या बोटात एक प्रमुख हिरा असलेली आकर्षक कॉकटेल रिंगदेखील आहे. ८० ते ९० कॅरेट वजनाचा हा हिऱ्याचा तुकडा अत्यंत मौल्यवान आहे आणि त्याची किंमत किमान $५ दशलक्ष असल्याचा अंदाज आहे. नीता अंबानींच्या या अंगठीची किंमत भारतीय चलनात ४० कोटींहून अधिक आहे.

आणखी वाचा – लग्नानंतर देवदर्शन करत आहेत मुग्धा-प्रथमेश, उत्तरप्रदेशमध्ये भटकंती, गंगेचं दर्शन घेतलं अन्…; फोटोंनी वेधलं लक्ष

एप्रिल २०२३ मध्ये नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NAMCC) च्या उद्घाटन समारंभात अनंत अंबानी यांनी पाटेक फिलिप घड्याळ घातले होते. या ‘घड्याळाची’ किंमत जाणून धक्का बसेल. रिपोर्ट्सनुसार, अनंतच्या या घड्याळाची किंमत १८ कोटी रुपये होती. अंबानी कुटुंबातील नववधू राधिका मर्चंटकडेही अनमोल दागिने आहेत. अनंत अंबानीची पत्नी राधिका हिच्याजवळ अंदाजे १५ कॅरेटचा हिऱ्याचा हार आहे आणि त्याची किंमत अंदाजे $५००,००० आहे. अहवालानुसार, एकूण हार व कानातल्यांची किंमत $१,५००,००० आहे, जी भारतीय चलनात अंदाजे १२,४७,३५,५०० रुपये आहे.

Tags: ambani familyAmbani Family Expensive Accessoriesambani family lifestyleambani family weddingentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Marathi actor Prashant Damle suffered a heart attack in 2013 see the details

"४-५ सेकंद हृदय बंद आणि…", प्रशांत दामलेंना आलेला हृदयविकाराचा झटका, ऑपरेशनसाठी गेले अन्…; म्हणाले, "उपचार करताना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.