सध्या अंबानी कुटुंबात लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी राधिका मर्चंटसह लग्नबंधनात अडकणार आहे. गुजरातमधील जामनगर येथील रिलायन्स ग्रीन्स येथे १ ते ३ मार्चमध्ये विवाहपूर्वीचे विधी पार पडणार आहेत. अंबानी कुटुंब हे देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे. हे अंबानी कुटुंब अत्यंत सुखी जीवन जगत आहे. संपत्तीच्या बाबतीतही हे कुटुंब अगदी अग्रस्थानी असलेलं पाहायला मिळतं. (Ambani Family Expensive Accessories)
मुकेश अंबानी व नीता अंबानी यांची लाडकी मुलगी ईशा अंबानी हिच्याकडेही अनेक महागडे दागिने आहेत. ईशाकडे असलेल्या एका नेकलेस पीसने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा नेकलेस मल्टी-स्ट्रँड अनकट डायमंड पीस आहे, ज्यामध्ये पन्नासहून अधिक हिऱ्यांचा समावेश आहे. एनएमएसीसी लाँचच्या एका लग्न समारंभात ईशाने पहिल्यांदा हा हिऱ्याचा नेकलेस घातल्याचे बोलले जात आहे. या वैयक्तिक डायमंड नेकलेसची किंमत 20 दशलक्ष रुपयांपेक्षा जास्त म्हणजे सुमारे १६५ कोटी रुपये आहे.
नीता अंबानी अनेक मौल्यवान दागिने व ॲक्सेसरीजच्या मालक आहेत. नीता यांच्या बोटात एक प्रमुख हिरा असलेली आकर्षक कॉकटेल रिंगदेखील आहे. ८० ते ९० कॅरेट वजनाचा हा हिऱ्याचा तुकडा अत्यंत मौल्यवान आहे आणि त्याची किंमत किमान $५ दशलक्ष असल्याचा अंदाज आहे. नीता अंबानींच्या या अंगठीची किंमत भारतीय चलनात ४० कोटींहून अधिक आहे.
एप्रिल २०२३ मध्ये नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NAMCC) च्या उद्घाटन समारंभात अनंत अंबानी यांनी पाटेक फिलिप घड्याळ घातले होते. या ‘घड्याळाची’ किंमत जाणून धक्का बसेल. रिपोर्ट्सनुसार, अनंतच्या या घड्याळाची किंमत १८ कोटी रुपये होती. अंबानी कुटुंबातील नववधू राधिका मर्चंटकडेही अनमोल दागिने आहेत. अनंत अंबानीची पत्नी राधिका हिच्याजवळ अंदाजे १५ कॅरेटचा हिऱ्याचा हार आहे आणि त्याची किंमत अंदाजे $५००,००० आहे. अहवालानुसार, एकूण हार व कानातल्यांची किंमत $१,५००,००० आहे, जी भारतीय चलनात अंदाजे १२,४७,३५,५०० रुपये आहे.