आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटात झळकलेले छोटी बबिता फोगट म्हणजेच सुहानी भटनागर हिचं वयाच्या १९व्या वर्षी निधन झालं आहे. जगाचा निरोप घेतलेल्या सुहानी भटनागरला तिच्या मृत्यूची आधीच कल्पना होती का? असा प्रश्न अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर सर्वांना पडला आहे. सुहानीवर बरेच दिवस उपचार सुरु होते, त्यानंतर अभिनेत्रीबाबत आज वाईट बातमी समोर आली आहे. सुहानी भटनागरने अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेत्रीची दुःखद बातमी समोर आल्यानंतर तिची एक जुनी इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टवरील कॅप्शनने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Suhani Bhatnagar Last Post)
अभिनेत्रीने या पोस्टखाली दिलेलं कॅप्शन पाहून तिच्या आयुष्यात काही वाईट घडणार असल्याचे संकेत दिले असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. जगाचा निरोप घेताच सुहानी भटनागरची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होत असून ती पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. सुहानी भटनागरने या पोस्टमध्ये काही सुंदर फोटो पोस्ट केले होते. पण पोस्टच्या कॅप्शनमध्ये एकच शब्द लिहिला होता आणि हा शब्द नोव्हेंबर असा होता. नोव्हेंबर लिहिल्यानंतर अभिनेत्रीचं हे कॅप्शन पाहून चाहत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ते पाहून असं वाटत आहे की, ती या महिन्याशी संबंधित काही संकेत देत आहे.
कदाचित निरोगी आयुष्य जगताना अभिनेत्रीला हा आपला शेवटचा महिना वा शेवटची पोस्ट असल्याची जाणीव झाली असावी. सुहानी भटनागर तिच्या शेवटच्या दिवसांत प्रकृतीच्या बिघडलेल्या अवस्थेतून जात होती. काही काळापूर्वी तिचा अपघात झाला होता आणि ती सतत औषधे घेत होती. यापैकी काही औषधांनी तिच्या शरीरावर फरक पडला आणि तिच्या शरीरात पाणी साचू लागले. दरम्यान अभिनेत्रीवर उपचार सुरु होते. मात्र या आजाराशी सुहानीची झुंज अपयशी ठरली.
सुहानी भटनागर हिने जगाचा कायमचा निरोप घेतला. २०१६ मध्ये ‘दंगल’ चित्रपटात दिसलेली छोटी सुहानी भटनागरला शिक्षण पूर्ण केल्यानंतर चित्रपटात काम करायचे होते. त्यामुळे या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्यानंतर तिने सिनेसृष्टीतून ब्रेकही घेतला होता.