शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“दुर्लक्ष, कामचुकारपणा अन्…”, इमारतीसमोर कचरा जाळत आहेत ते पाहून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “पोलिसांत तक्रार…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 17, 2024 | 3:58 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Mugdha Godbole Post

"दुर्लक्ष, कामचुकारपणा अन्…", इमारतीसमोर कचरा जाळत आहेत ते पाहून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, "पोलिसांत तक्रार…"

मराठी सिनेसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत जे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. बरेचदा ही कलाकार मंडळी सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करत आपलं परखड मत व्यक्त करताना दिसतात. त्यांना न पटलेले मुद्दे, सार्वजनिक होणारा त्रास असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर मराठी कलाकार संपत प्रतिक्रिया देताना दिसतात. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडलेल्या एका सामाजिक मुद्द्यांवरील भाष्याने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे मुग्धा गोडबोले. (Mugdha Godbole Post)

मुग्धाने याआधी अनेक मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. ‘अजूनही बरसात आहे’, ‘ठिपक्यांची रांगोळी’, यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी मालिकांच्या लेखनाची जबाबदारीही तिने सांभाळली आहे. अशातच मराठी मनोरंजनसृष्टीतील या लोकप्रिय अभिनेत्रीने शेअर केलेली अशीच एक फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने त्या राहत असलेल्या परिसरातील एक व्हिडीओ फेबसबुकवरुन पोस्ट करत प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट पाहून चाहत्यांनी या पोस्टवरुन तिला सल्ला दिलेला पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – ‘दंगल’ फेम अभिनेत्रीचं १९व्या वर्षी धक्कादायक निधन, आजाराशी झुंज अपयशी, आई-वडिलांची अवस्था पाहवेना

अभिनेत्रीने तिच्या फेसबुकवरुन पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “रोज सकाळी आमच्या आजूबाजूला कचरा जाळतात. कित्येक तास तो धूर नाकात, घशात जाणवत राहतो. अनेक सोसायट्याच कचरा उचलणाऱ्या माणसांना ‘इथेच जाळून टाका ‘ असं सांगतात म्हणे. म्हणजे आता याबद्दलही तक्रार करणं आलं. पण हा काय आळस आहे? का दुर्लक्ष, का कामचुकारपणा? आणि असला तर कुणाचा?”, असा प्रश्न तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडला.

आणखी वाचा – “अमन गुप्ताचं नशिबंच फाटकं आणि…”, ‘शार्क टँक इंडिया’मध्ये सहभागी झालेल्या व्यावसायिकाचं धक्कादायक वक्तव्य, म्हणाला, “चेक फाडला…”

यानंतर अभिनेत्रीने पुन्हा यावर एक पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “याचविषयी काल लिहिलं होतं. मी या लोकांना पोलिसांत तक्रार करेन असं म्हणाले आहे, यावर यांचं म्हणणं आहे की, पालापाचोळा उचलायला एवढ्या आत गाडी येत नाही. आम्हाला पायी चालत लांबवर हे न्यावं लागतं. यावर काय उपाय असतो? या बायकांची दयाही येते. पण त्या जे करत आहेत तेही चुकीचं आहे”, असंही तिने म्हटलं आहे.

Tags: entertainmentmarathi actressMugdha Godbole angry postMugdha Godbole Postmugdha godbole ranade
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Tula Shikvin Changlach Dhada serial new twist video viral on social media

अधिपतीला अक्षरापासून वेगळं करण्यासाठी भुवनेश्वरीची नवी खेळी, ‘तुला शिकवीन...'मध्ये नवं वळण, प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.