सोशल मीडिया हे सगळ्यांना वेड लावणारे आणि वेळ वाया घालवण्याचे माध्यम झाले आहे. कितीतरी लोक कधीही, कुठेही आणि केव्हाही रिल्स बघत वेळ घालवत असतात. त्यामुळे ट्रेंडिंग रील बनवणे आणि ते रील व्हायरल होण्यासाठी लोकं अक्षरश: काहीही करत आहेत. सोशल मीडियावर रोज असे असंख्य रील व्हायरल होत असतात.
सोशल मीडियावर रोज एक नवीन ट्रेंड तयार होत असतो आणि एकामागून एक ट्रेंड्स बदलतदेखील असतात. अशातच सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. जो पाहून एका क्षणी हसूही येते आणि एका क्षणी हा व्हिडीओ पाहताच आपण हा व्हिडीओ का पाहत आहोत म्हणून रडूही येईल. सोशल मीडियावर लग्नमंडपातील नवरा-नवरीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
God save my country from reels ????
— Rahul Roushan (@rahulroushan) February 14, 2024
pic.twitter.com/B7h6oyWWQ1
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका लग्न मंडपात नवविवाहित वधू-वर बसले आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला या वधू-वराचे संपूर्ण कुटुंब उभे आहे. लग्नादरम्यान, पत्नीच्या भांगेत कुंकू लावण्याचा विधी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे आणि नवरदेव याच विधीचा एक रील व्हिडीओ करत आहे.
पत्नीच्या भांगेत कुंकू भरत असताना नवरदेव ‘विवाह’ या लोकप्रिय चित्रपटातील ‘दो अंजाने’ हे प्रसिद्ध गाणं गात आहे. यादरम्यान, घरातील इतर कुटुंबीय पुतळ्यासारखे उभे आहेत. उभ्या असलेल्या कुटुंबियांपैकी कोणाच्याही चेहऱ्यावर भाव नसलेले दिसून येतात. सगळे अगदी गंभीर चेहऱ्याने उभे आहेत. नवरदेव मात्र अगदी फिल्मी स्टाईलमध्ये हाभाव करत आहे.
आणखी वाचा – आदर्श शिंदेने महाबळेश्वरमध्ये सुरु केलं स्वतःचं ज्यूस सेंटर?, फोटोही केला शेअर, म्हणाला, “फोटो काढला आणि…”
दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडिया तूफान व्हायरल होत असून या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत ५ लाख लोकांनी पाहिले असून अनेकांकडून या व्हिडीओला अजूनही मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.