जन्माला आल्यावर पहिली व्यक्ती नजरेसमोर येते ती म्हणजे आई. डोळ्यात समावलेलं आईच ते रूप अगदी आजन्म तसेच साठून राहत. पण आयुष्यात एक वेळ अशी येते कि जिवापेक्षा प्रिय लोकांना आपला निरोप घ्यावा लागतो आणि त्यामुळे कधी हि न भरता येणारी पोकळी आयुष्यात निर्माण होते. अशी दुःखद वेळ आलीये अभिनेत्री माधुरी दीक्षितवर आज सकाळी माधुरीच्या आई म्हणजेच श्रीमती स्नेहलता दीक्षित यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे दीक्षित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.(Madhuri Dixit Mother Death)

आज सकाळी साडे आठच्या सुमारास स्नेहलता यांनी आयुष्यातील प्रवास थांबवला आणि त्या अनंतात विलीन झाल्या आहेत. स्नेहलता यांच्या निधनाची बातमी कुटूंबीय रिकु यांच्या कडून देण्यात आली. वृद्धापकाळामुळे स्नेहलता यांचं निधन झाल्याचं यांनी माहिती देताना सांगितलं गेलं आहे. तर इंडस्ट्रीतील इतर कलाकारांकडून देखील शोक व्यक्त केलेला पाहायला मिळतोय.(Madhuri Dixit Mother Death)
वयाच्या ९१ व्य वर्षी स्नेहलता दीक्षित यांनी राखेचा श्वास घेतला. वरळी येथील वैकुंठ धाम समशानभूमीत स्नेहलता यांच्यावर अंत्यसंसकार करणार येणार असल्याचं सांगितलं आहे. आज दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. आयुष्यात लहान मोठ्या, सुख दुःखात प्रत्येक वेळी स्नेहलता या अभिनेत्री माधुरीचा आधार बनलेल्या दिसून आलं आहे. बऱ्याच माधुरीने हि माझी आई हि फक्त आई नसून माझी खूप जवळची मैत्रीण देखील आहे जिच्याशी मी सगळं शेअर करू शकते असं हि माधुरीने बऱ्याचदा सांगितले आहे. त्यामुळे स्नेहलता यांच्या जाण्याने माधुरीच्या आयुष्यात पुढील प्रत्येक वळणावर माधुरीला त्यांची उणीव नक्की भासेल. स्नेहलता दीक्षित यांच्या आत्म्यास शांती लाभो.