शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘छत्रपती संभाजी’ चित्रपटातून तरुण पिढीला पाहता येणार महाराजांची शौर्यगाथा, पराक्रम अन् बलिदानाचा इतिहास मोठ्या पडद्यावर

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 4, 2024 | 12:32 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Chhatrapati sambhaji movie released in five different langauages see the details

‘छत्रपती संभाजी’ चित्रपटातून तरुण पिढीला पाहता येणार महाराजांची शौर्यगाथा, पराक्रम अन् बलिदानाचा इतिहास मोठ्या पडद्यावर

आजवर अनेक चित्रपट व मालिकांमधून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षकांनीही या कलाकृतींना भरभरून प्रतिसाद दिला आहे. अशातच आता छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट सांगणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाला व बलिदानाला जगाच्या इतिहासात तोड नाही. संकटाला निर्भीडपणे सामोरे जात पराक्रमाच्या जोरावर अल्पकाळात मराठा साम्राज्याचा विस्तार व संरक्षण करणाऱ्या पराक्रमी राजाचा जीवनपट उलगडणारा ‘छत्रपती  संभाजी’ हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. राकेश सुबेसिंह दुलगज निर्मित आणि ‘परफेक्ट प्लस एंटरटेनमेंट’ आणि ‘एजे मीडिया कॉर्प’ प्रस्तुत ‘छत्रपती संभाजी’ हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू तसेच इंग्रजी आदी भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. 

राजकारण, मुसद्देगिरी, समाजकारण व धर्मकारण यांच्यात मुरलेले छत्रपती संभाजी महाराज  रणांगणावरचे शेर होते. स्वराज्यनिष्ठा, शौर्य, धैर्य अशा अनेक अंगाने अनेक मोहिमा यशस्वी करणाऱ्या महाराजांनी निर्माण केलेला प्रेरणादायी इतिहास ‘छत्रपती संभाजी’ या चित्रपटातून तरुण पिढीला पाहता येणार आहे. राजकारणातील डावपेच, गनिमी कावा या जोरावर छत्रपती संभाजी महाराजांनी सलग नऊ वर्षे मुघल, आदिलशहा, सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज, आणि इतर अंतर्गत शत्रूंशी लढा देत, स्वराज्याला टिकवले आणि वाढविले. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अजोड पराक्रमाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्या साम्राज्याचा विस्तार केला.

आणखी वाचा –“कॅन्सरसारख्या आजाराची चेष्टा…”, पूनम पांडेच्या मृत्यूच्या खोट्या बातमीवर मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “बहिष्कार टाकावा अन्…”

प्रमोद पवार, शशांक उदापूरकर, रजित कपूर, दिलीप ताहिल, मृणाल कुलकर्णी, मोहन जोशी, भरत दाभोळकर, लोकेश गुप्ते, बाळ धुरी, दिपक शिर्के,अमित देशमुख, कै. आनंद अभ्यंकर,समीर,मोहिनी पोतदार, प्रिया गमरे आदी कलाकार ‘छत्रपती संभाजी’ चित्रपटात आहेत.

आणखी वाचा – Video : क्रांतीने रेडकरने असा साजरा केला आईचा वाढदिवस, खास व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आईसारखे दैवत…”

चित्रपटाला साजेशी ६ गाणी चित्रपटात असून अविनाश-विश्वजित, गुरु शर्मा व आरव यांचे संगीत चित्रपटाला लाभले असून पार्श्वसंगीत अमर-अमित देसाई यांनी दिले आहे. ‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाची सहनिर्मिती एफआयएफ निर्मिती संस्थेची आहे. कथा सुरेश चिखले यांची आहे. छायांकन सुरेश देशमाने तर संकलन भरत भाई यांचे आहे. कला अनिल वठ यांची आहे. साहसदृश्ये पी. सतीश यांची आहेत.  

Tags: Chhatrapati sambhaji movieentertainment newsmarathi entertainment newsmarathi moviesMarathi newsछत्रपती संभाजीमनोरंजन बातमीमराठी चित्रपटमराठी बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
The shooting of the second part of the popular movie Navara Mazha Navsacha will start from tomorrow and film will be released soon.

तब्बल २० वर्षांनी येणार ‘नवरा माझा नवसाचा' चित्रपटाचा दूसरा भाग येणार, अभिनेत्याने पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाला…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.