बॉलीवूड इंडस्ट्रीत अनेक लोकप्रिय गाणी गात गायक राहत फतेह अली खान यांनी स्वतःच स्थान निर्माण केलं. काही दिवसांपूर्वीच एका चुकीच्या कृतीमुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला. दरम्यान त्याने त्याच्या या वर्तनाबद्दल कुटुंब, गायक समुदाय व संगीत दिग्दर्शकांची माफी मागितली आहे. अलीकडेच राहत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते आपल्या नोकराला बुटांनी मारहाण करताना दिसला. मारहाण करत असताना राहत यांना बाटली सापडत नसल्याचे वारंवार सांगत होता. या व्हिडीओवर जोरदार टीका झाली आणि राहत यांच्या हिंसक वर्तनाचा लोकांनी मोठ्या प्रमाणावर निषेध केला. (Rahat Fateh Ali Khan Apologises)
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, राहत यांनी या प्रकरणाचे वर्णन ‘गुरू व शिष्य यांच्यातील परस्पर संबंध’ असे केले होते. आपले स्पष्टीकरण देताना त्याने हसनैन नावाच्या व्यक्तीबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्याला तो मारहाण करताना दिसत होते. हसनैन कॅमेऱ्यात सांगत होता की, त्याने एक बाटली चुकीची ठेवली होती ज्यामध्ये ‘पीर साहेबांचे वाफवलेले पाणी’ होते. मात्र या प्रकाराच्या खुलाशामुळे लोक आणखी संतप्त झाले आणि राहत यांच्यावर टीका करु लागले. आता हे प्रकरण अधिकच चिघळल्यानंतर राहत यांनी आपल्या चाहत्यांसह एका व्हिडीओद्वारे माफी मागितली आहे.
Rahat Fateh Ali Khan issues an unconditional apology to all his fans for the recent video. He alleges conspiracy and that more videos will surface in the days to come. pic.twitter.com/poXUfYM7Rs
— Faridoon Shahryar (@iFaridoon) February 1, 2024
फरीदान शहरयारने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये राहत त्याच्या चाहत्यांची माफी मागत आहे. यावेळी ते असं म्हणताना दिसत आहे की, “माझ्याकडून झालेल्या चुकीबद्दल मला माफी मागायची आहे. सर्वप्रथम, मी अल्लाह ताला, माझ्या प्रभुकडून क्षमा मागतो, अल्लाह तला मला क्षमा करतील. ज्याने सर्व मानवांना समान बनवले आहे. एक माणूस म्हणून मी इतर कोणत्याही माणसाशी असे वागू नये आणि कलाकार म्हणून नक्कीच नाही”.
राहत यांनी त्याच्या कुटुंबाची व गायक समुदायाची माफीही मागितली. ते म्हणाले, “माझे कुटुंब ६०० वर्षांपासून कबालीची मजा पुढे नेत आहे. आमचा संदेश प्रेम, शांती व बंधुत्वाचा आहे. मी माझ्या कुटुंबातील प्रत्येकाची, माझ्या कुटुंबाची, माझ्या कुटुंबातील मित्रांची, माझ्या सर्व मित्रांची व माझ्या सर्व चाहत्यांची माफी मागतो जे माझ्या वागण्याने खूप दुखावले आहेत. आणि सर्व प्रथम, मी माझ्या अल्लाहची माफी मागतो की, मी ही चूक पुन्हा करणार नाही”. ते पुढे म्हणाले, “माझ्या वर्तनाबद्दल मी सर्वांची, गायक मंडळींची, माझ्याबरोबर काम केलेल्या सर्व महिला कलाकारांची माफी मागतो. त्याचप्रमाणे सर्व संगीत दिग्दर्शकांचीही मी माफी मागतो” असं म्हणत त्यांनी साऱ्यांची माफी मागितली आहे.