रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘देवमाणूस’मधील डॉक्टर व डिंपी एकमेकांच्या प्रेमात?, फोटो शेअर करत दिली नात्याची कबुली, चाहत्यांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 1, 2024 | 4:53 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kiran Gaikwad And Asmita Deshmukh

'देवमाणूस'मधील डॉक्टर व डिंपी एकमेकांच्या प्रेमात?, फोटो शेअर करत दिली नात्याची कबुली, चाहत्यांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव

‘आमचं ठरलं’ म्हणत सिनेसृष्टीत अनेक जोड्या लग्नबंधनात अडकल्या. एकामागोमाग एक लोकप्रिय जोड्यांनी लगीनगाठ बांधत शाही थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा उरकला. तर काहींनी थेट त्यांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो शेअर करत त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. तर काहींनी सोशल मीडियावर त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली देत चाहत्यांना सुखद धक्का दिला. अशातच आणखी एका कलाकार जोडीने शेअर केलेल्या पोस्टने साऱ्यांना संभ्रमात टाकलं आहे. (Kiran Gaikwad And Asmita Deshmukh)

“ए फेब्रुवारी आहे. आतातरी फायनली आपण सगळ्यांना सांगूयात का” असं हटके कॅप्शन देत अभिनेता किरण गायकवाडने शेअर केलेल्या पोस्टने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. अभिनेता किरण गायकवाडने अभिनेत्री अस्मिता देशमुखला पुष्पगुच्छ देतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोखाली त्याने आता सांगायचं का सगळ्यांना असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे किरण व अस्मिताही रिलेशनशिपमध्ये आहेत का? हा प्रश्न साऱ्यांना सतावत आहे.

आणखी वाचा – शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरेचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न, लेहंग्यामध्ये मंडपात एन्ट्री केली अन्…; सुंदर व्हिडीओ समोर

View this post on Instagram

A post shared by Kiran Shakuntla Gaikwad (@kiran_gaikwad12)

ही पोस्ट शेअर करताच किरण व अस्मिताच्या चाहत्यांनी कमेंट करायला सुरुवात केली असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान अभिनेत्रींच्या बहिणीने रिलेशनशिपच्या चर्चांना पूर्णविराम दिलेला पाहायला मिळत आहे. अस्मितेची बहीण ज्ञानेश्वरी हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन किरण व अस्मितेची पोस्ट शेअर करत,”अभिनंदन लव्ह बर्ड्स. तुमच्यासाठी खूप आनंदी आहे” असं म्हणत ही पोस्ट रिपोस्ट केली आहे. तर काहींनी ही पोस्ट पाहता हे प्रमोशन असल्याची शक्यता वर्तविली आहे.

आणखी वाचा – Video : फुगड्या घातल्या, नवरदेवाची घोड्यावरुन मंडपात एन्ट्री अन्…; शिवानी-अजिंक्यच्या लग्नाचा थाटच न्यारा, घरातील मंडळींनी धरला ठेका आणि…

‘देवमाणूस’ या मालिकेने निरोप जरी घेतला असला तरी आजही ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. या मालिकेत किरण व अस्मिता यांना एकत्र छोटया पडद्यावर पाहणं रंजक ठरलं. या मालिकेतील डिम्पल या भूमिकेमुळे अस्मिताला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. सध्या अस्मिता ‘तुझी माझी जमली जोडी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर किरणने आजवर विविध मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली.

Tags: entertainmentkiran gaikwadkiran gaikwad and asmita deshmukhkiran gaikwad and asmita deshmukh lovemarathi actormarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Rahat Fateh Ali Khan Apologises

Video : "अल्लाह मला…", दारुच्या बॉटलवरुन नोकराला बेदम मारणाऱ्या राहत फतेह अली खान यांना समजली स्वतःचीच चूक, म्हणाले, "माझ्या कुटुंबाची…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.