काही व्यक्ती ज्या प्रमाणे नेहमी आनंद देत असतात त्याच प्रमाणे काही कार्यक्रम ही नित्यनियमांन हेच काम गेले कित्येक दिवसांपासून करत आले आहेत. काही कुटुंबांमध्ये हे कार्यक्रम पाहिल्याशिवाय जेवण जात नाही, तर काहींना मानसिक तणावणातून रिलीफ मिळावी म्हणून सुद्धा या कार्यक्रमांची मदत होते. याच कार्यक्रमांच्या यादितील एक कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा घरोघरी एखादा सदस्य असावा असा राहत असलेला कार्यक्रम. कोरोना काळात घरात अडकलेल्या जनतेसाठी एका प्रकारचा बुस्टर डोस प्रमाणे हास्यजत्रेने कित्येकांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवलं.(Prasad Oak Party)
====
हे देखील वाचा – डबल रोल मात्र आवाज देणारी व्यक्ती एक, काय आहे मृणाल यांचा नेमका किस्सा
====
या हास्य जत्रातील कलाकाराकच्या कलेला वाव देणारी मंडळी म्हणजे अभिनेता प्रसाद ओक आणि अभिनेत्री साई ताम्हणकर. परीक्षकाच्या खुर्चीवर बसून विनोदी पंचेस अनुभवताना कधी कधी यांना हि या पंचेसचा भाग व्हावं लागत. प्रसाद ओक संबंधित असाच एक हमखास गाजणारा पंच आता बहुतके बंद होणार असं एका रील वरून प्रेक्षकांना वाटलं.

हास्यजत्रेच्या स्किट्स मध्ये ‘पार्टी कधी देणार’ हा गाजणार पंच आता बंद होणार असं सोनी मराठीने शेअर केलेल्या एका रील वरून दिसतंय. रील मध्ये मध्यभागी पार्टी देणारे प्रसाद ओक बसलेले दिसत आहेत तर आजूबाजूला पार्टीची वाट भागानरी मंडळी दिसत आहेत. नेहमीच्या प्रश्नावर अखेर पार्टी नक्की देणार असं प्रसाद म्हणाला आणि आनंदी होऊन कलाकार मंडळी नाचताना दिसत आहेत. पण काहनती ट्विस्ट पुढे येतो जेव्हा प्रसाद दबक्या आवाजात नाही देणार असं म्हणतो पण कुणालाही ते समजत नाही त्यामुळे मंडळी आता पार्टी मिळणार या आशेवरच दिसतंय.(Prasad Oak Party)

हा झाला विनोदी भाग पण हि मंडळी जेवढं मन लावून प्रेक्षकांना हसवतात तितकाच मन लावून परीक्षक सुद्धा त्यांच्या अभिनयाला दाद देतात आणि कलाकारांचं आत्मबळ वाढवतात. हास्यजत्रेची हि सुसाट गाडी या कलाकारांच्या अभिनयामुळे आणि प्रसाद ओक, साई ताम्हणकर या दर्दी हास्यरसिकांमुळे अशीच अविरत चालत राहील आणि प्रेक्षकांचं मनोरंजन असच सुसाट धावत राहील एवढं नक्की.