शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हा माणूस एक भाबडा…”, मनोज जरांगे-पाटलांच्या आंदोलनात सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सहभागी, म्हणाली, “आता तरी न्याय…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 25, 2024 | 5:15 pm
in Trending
Reading Time: 2 mins read
google-news
Marathi actress Ashwini Mahangde has shared a post supporting Manoj Jarange Patil

“हा माणूस एक भाबडा...”, मनोज जरांगे-पाटलांच्या आंदोलनात सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सहभागी, म्हणाली, “आता तरी न्याय...”

सध्या राज्यभरात सर्वत्र मराठा आरक्षण हा चर्चेचा विषय आहे आणि ही चर्चा होण्याचे एकमेव कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील. मराठा आरक्षणासाठी त्यांनी पुकारलेल्या उपोषण आंदोलनामुळे मनोज जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. त्यामुळे त्यांनी मागितलेल्या न्यायाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईची वाट धरली आहे. मनोज यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून त्यांच्या या पायी मोर्चाची सुरवात केली असून हा मोर्चा आता मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होत आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या या संघर्षासाठी त्यांना महाराष्ट्रातील जनतेने मोठ्या प्रमाणात पाठींबा दिला आहे. मनोज यांना गावच्या खेड्यापड्यातून पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच एका मराठी अभिनेत्रीनेदेखील मनोज यांच्या या संघर्षासाठी पाठिंबा दिला आहे. ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतील अश्विनी महांगडे या अभिनेत्रीने मनोज यांना पाठिंबा देत त्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Asʜvɪɴɪ Pʀᴀᴅɪᴘᴋᴜᴍᴀʀ Mᴀʜᴀɴɢᴀᴅᴇ (@ashvinimahangade)

आणखी वाचा – “हा माणूस महाराष्ट्राला कधी कळणार?”, राज ठाकरेंचा व्हिडीओ शेअर करत तेजस्विनी पंडितची पोस्ट, जाती-धर्मावरुन भाष्य अन्…

अश्विनीने मनोज यांचा एक फोटो शेअर करत असे म्हटले आहे की, “साधं फिरायला जाऊन घरी परतलो तरी पुढचे दोन ते तीन दिवस फार दमलो म्हणत आपण काढतो. पण हा माणूस एक भाबडा म्हणावं की वेडा म्हणावं. आलेल्या हजारो संकटांना या माणसाने याच्या सहज बोलण्याने, खरेपणाने परतवून लावले. आज लाखो मुलांच्या डोळ्यात एक स्वप्नं आहे की आता तरी न्याय मिळेल. हा विश्वास या माणसाने त्याच्या आरक्षणाप्रती असलेल्या सातत्याने, समाजाप्रती असलेल्या प्रेमाने निर्माण केला, टिकवला, वाढवला. म्हणूनच आज समाजाचा एक भाग म्हणून या आंदोलनात सोबत करणे हे माझे कर्तव्य वाटते. हा फोटो माणूस म्हणून बघाल तर जीवाची घालमेल होईल”.

आणखी वाचा – “मिसिंग प्रकरण जरा जास्त होतंय पण…”, नवऱ्याशिवाय अंदमानला गेलेल्या मुग्धा वैशंपायनला अजिबातच करमेना, म्हणाली, “काय करु… “

पुढे अश्विनी म्हणाली, “टीप – माझे कलाकार म्हणून काम पाहणारे आणि माझ्यावर प्रेम करणारे हे एका समाजाचे नाहीत, तर ते १२ बलुतेदार, १८ पगड जातीचे आहेत. आज मी मराठा आंदोलनात सहभाग दर्शवणे म्हणजे त्या सगळ्या लोकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय व्हावा असे अजिबात नाही, समाजातील सर्वच घटकांना समान न्याय मिळावा हेच माझे मत”. दरम्यान, अश्विनीने शेअर केलेली ही पोस्ट सध्या व्हायरल होत असून अनेकांनी या पोस्टला लाईक्स् व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तिच्या चाहत्यांसह अनेकांनी अभिनेत्रीच्या या कृतीचे समर्थन केले आहे. त्याचबरोबर कमेंट्समध्ये अनेकांनी तिच्या या समर्थनाला पाठिंबा दर्शवला असल्याचे पाहायला मिळत आहे.           

Tags: Ashwini Mahangdemanoj jarange patilmarathi actressmarathi entertainment newsअश्विनी महांगडेमनोज जरांगे पाटीलमराठी अभिनेत्री
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Bigg boss 17 aishwarya sharma react on isha malviya nad says once a dumb always a dumb see the details

Bigg Boss 17 : "मुर्ख होती आणि मुर्खच...", ईशा मालवीयला नको नको ते बोलली ऐश्वर्या शर्मा, आरोपही केले, म्हणाली, "अभिषेकच्या आयुष्यामध्ये..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.