शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

…अन् सलमान खानने शब्द पाळला, नऊ वर्षीय कॅन्सरग्रस्त मुलाची इच्छा केली पूर्ण, स्वतः त्याच्या घरी गेला आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 25, 2024 | 2:59 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Salman Khan Fam Moment

...अन् सलमान खानने शब्द पाळला, नऊ वर्षीय कॅन्सरग्रस्त मुलाची इच्छा केली पूर्ण, स्वतः त्याच्या घरी गेला आणि...

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने आजवर त्याच्या अभिनयाबरोबरच लाखो लोकांच्या मदतीसाठी पुढे येत प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. बरीच अशी कलाकार मंडळी आहेत जी नकळतपणे गरजूंना मदत करत असतात. मात्र याबद्दल ते कुठेही काहीच बोलत नाही. दरम्यान सलमान खान आपल्या आश्वासनांमध्ये किती खरा आहे याचा पुरावा नुकताच पाहायला मिळाला. सलमान खान अलीकडेच त्याच्या नऊ वर्षीय चाहता जगनबीरला भेटला, ज्याने केमोथेरपीच्या नऊ फेऱ्यांनंतर कर्करोगाचा पराभव केला. (Salman Khan Fam Moment)

२०१८ मध्ये, सलमान खान पहिल्यांदा जगनबीरला मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये भेटला, जिथे चार वर्षांच्या मुलावर त्याच्या ट्यूमरसाठी केमोथेरपी सुरु होती. कॅन्सरशी लढाई संपल्यानंतर सलमान खानने जगनबीरला बळ मिळावे म्हणून त्याला भेटण्याचे आश्वासन दिले होते आणि सलमान खान त्याला भेटायला आला होता. गेल्या वर्षी जगनबीरने कॅन्सरवर मात केल्यामुळे, सलमानने डिसेंबर २०२३ मध्ये त्याच्या वांद्रे येथील घरी त्याची भेट घेतली आणि जगनबीरच्या उपचारांच्या वाईट काळात त्याने दिलेले वचन पूर्ण केले.

आणखी वाचा – Fighter Movie Review : दीपिका पदुकोण व हृतिक रोशनचा ‘फायटर’ चित्रपट पाहावा की नाही, पहिला Review समोर, प्रेक्षक म्हणाले…

‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत जगनबीरची आई सुखबीर कौर यांनी खुलासा केला की, “वयाच्या तिसऱ्या वर्षी जगनबीरच्या मेंदूमध्ये नाण्यांच्या आकाराचा ट्यूमर असल्याचे निदान झाले होते, त्यानंतर त्यांची दृष्टी कमी होऊ लागली होती. या कठीण परिस्थितीला तोंड देत दिल्ली किंवा मुंबईत उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. जगनच्या प्रकृतीची काळजी घेऊन त्याचे वडील पुष्पिंदर यांनी त्याला मुंबईला नेण्याचा निर्णय घेतला. मासूम जगनला खात्री होती की तो सलमान खानला नक्कीच भेटेल”.

आणखी वाचा – “स्वतःला हिंदू म्हणतो तेव्हा…”, धर्मावरुन गश्मीर महाजनीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत, म्हणाला, “प्रत्येक धर्माला…”

सुखबीर कौरने असाही खुलासा केला की, “जगनला असे पाहून तिने सत्य न सांगण्याचा निर्णय घेतला. एकदा जगनबीर रुग्णालयात दाखल असताना सलमानला भेटण्याची इच्छा व्यक्त करणारा व्हिडीओ बनवण्यात आला होता. जगनबीरला भेटून दिलेले वचन पूर्ण करणाऱ्या सलमानपर्यंत हा व्हिडीओ पोहोचला. भावनांनी भरलेल्या जगनने सलमानच्या चेहऱ्याला आणि त्याच्या ब्रेसलेटला स्पर्श केला. सुखबीरने आनंदाने सांगितले की त्यांचा मुलगा आता बरा आहे, त्याची ९९ टक्के दृष्टी परत आली आहे आणि तो दररोज शाळेत जातो”.

Tags: bollywood actorentertainmentsalman khansalman khan fansalman khan fan moment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

Video : 'बिग बॉस'च्या घरात 'त्या' व्हिडीओमध्ये सासूला पाहताच अंकिता लोखंडेच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला, वडिलांना दोष दिला अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.