अभिनेता गश्मीर महाजनीने आजवर मालिका व चित्रपटांमधून काम करत प्रेक्षकांवर अभिनयाची छाप पाडली. गश्मीरने साकारलेल्या ऐतिहासिक चित्रपटांमधील अनेक भूमिकांना चाहत्यांची पसंती लाभली आहे. गश्मीर अभिनयासह त्याच्या हँडसम लूकमुळेही चर्चेत असतो. काही दिवसांपासून गश्मीर चर्चेत आलेला पाहायला मिळाला आहे. कारण गश्मीरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तेव्हापासून महाजनी कुटुंब चर्चेत आलेलं पहायला मिळालं. (Gashmeer Mahajani Post)
गश्मीरचे वडील व मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले त्यावेळी त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र दोन दिवसानंतर जेव्हा ही निधनाची बातमी कळली, तेव्हा त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. शिवाय सोशल मीडियावरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. वडिलांच्या निधनानंतर गश्मीरला जोरदार ट्रोल करण्यात आलं. मात्र वेळोवेळी गश्मीरने नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिलेलं पाहायला मिळालं.
सध्या सर्वत्र रामलल्लाच्या आगमनाचा उत्सव साजरा करत आहेत. अशातच अनेक कलाकार मंडळींनी या राम मंदिराला भेट देत कार्यक्रमाची शोभा वाढवलेली पाहायला मिळाली. दरम्यान गश्मीरने हिंदू धर्मावरुन केलेली एक पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. गश्मीर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. तो नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच अभिनेता त्यांच्या सोशल मीडियावरील हिंदू धर्मावरुन शेअर केलेल्या एका पोस्टने लक्षवेधी ठरला आहे.
ही पोस्ट शेअर करत त्याने, “कसलीच लाज नाही, कसलीच अपराधी असल्याची भावना नाही, कसलीच माफी नाही, मला हिंदू असल्याचा गर्व आहे” अशा आशयाची पोस्ट शेअर केली आहे. यानंतर अभिनेत्याने दुसऱ्या पोस्टमध्ये, “आपण अध्यात्मिक लोक आहोत आणि आपण प्रत्येक धर्माला आपला धर्म मानतो. पण हे विचित्र आहे की जेव्हा आपण स्वतःला हिंदू म्हणतो तेव्हा लोकांना ते आक्षेपार्ह वाटते” असं कॅप्शन लिहिलेलं पाहायला मिळत आहे.