Bigg Boss Upadtes : ‘बिग बॉस’चे यंदाचे १७वे पर्व चांगलेच गाजले. ‘बिग बॉस’च्या यंदाचे पर्वात अनेक भांडणे, वाद, विवाद झाल्याचे पाहायला मिळाले. ‘बिग बॉस १७’चा प्रवास आता अंतिम भागाच्या दिशेने सुरू झाला आहे. त्यामुळे घरात बाकी असलेल्या सर्व स्पर्धकांमध्ये आता चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. अशातच नुकयाच पार पडलेल्या ‘वीकेण्ड का वार’मध्ये एका स्पर्धकाला या घरातून निरोप घ्यावा लागला आणि ती स्पर्धक म्हणजे आयेशा खान. आयेशा खानला कमी मतं मिळाल्यामुळे तिचा अंतिम भागाच्या दिशेने सुरु असलेला प्रवास काल (शनिवार २० जानेवारी) रोजी संपला.
एलिमिनेशनच्या यादीत विकी जैन, ईशा मालवीय व अंकिता लोखंडे यांचा समावेश होता. त्याच वेळी, जेव्हा ‘बिग बॉस’ आयेशाचे नाव घेतात आणि म्हणतात की “तुझा प्रवास आज इथे संपत आहे.” हे ऐकताच आयेशा भावुक होते. ‘बिग बॉस’च्या गेल्या भागाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात आयेशाला निरोप देताना घरतील इतर सदस्यही भावुक होतात.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आयेशाला निरोप देताना अंकिताला रडू येते व ती तिला घट्ट मिठी मारते. तसेच मन्नाराही आयेशाबरोबरचे पूर्वीचे वाद विसरून तिला मिठी मारत निरोप देते व “चला लवकरच हैदराबादमध्ये तुझ्या चित्रपटाच्या प्रीमिअरला भेटू” असं म्हणते. यापुढे ती विकीला भेटते आणि विकी तिला मिठी मारत “तू आता माझ्या कुटुंबाचाच एक हिस्सा आहेस” असं म्हणतो.
THE MOMENT #AyeshaKhan got Evicted!!
— Bigg Boss Livefeed_24X7 (@Sk_Khonji__24X7) January 20, 2024
& #AnkitaLokhande #VickyJain #IshaMalviya reached to Finale week ????#MannaraChorpa ne apni bat prove kar di ????
Follow me Pls ????#BB17 #BiggBos17 #BiggBoss #BiggBoss17 #MunAra #AnkuHolics pic.twitter.com/LfEGYTA0ik
यापुढे ती अरुण व अभिषेकला भेटून मुन्नवरच्या दिशेने जाते आणि “आपला प्रवास इथेच संपला…” असं म्हणते. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, आयेशा भविष्यातही मुन्नवर बरोबरची तिची लढाई सुरूच ठेवणार आहे. आयेशा या घरात येताच ती मुन्नवरचा पर्दाफाश करणार असल्याचे म्हटली होती. यानंतर घरात अनेकदा आयेशाने मुन्नवरबरोबर वाद घातले असल्याचे पाहायला मिळाले. तसेच मुन्नवरदेखील आयेशामुळे रडला असल्याचे प्रेक्षकांनी पाहिले आहे. पण आता आयेशाचा या घरातील प्रवास संपला आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरातील यावेळची नॉमिनेशन प्रक्रिया खूप वेगळ्या पद्धतीने पार पडली. घरातील सदस्यांसाठी रोस्ट नाईटचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात सर्व स्पर्धकांनी घरात आलेल्या प्रेक्षकांसमोर सादरीकरण केले. सर्व स्पर्धकांच्या कामगिरीवर तेथे उपस्थित प्रेक्षकांनी त्यांना मत दिले. या मतदानाच्या आधारे आयेशाला सर्वात कमी मते मिळाल्याने ती या घरातून बाहेर पडली.