रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याने मुंबईत खरेदी केलं हक्काचं घर, बायकोला दिलं सगळं श्रेय, म्हणाला, “ज्या हिंमतीने तू…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 20, 2024 | 7:51 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
maharashtrachi hasyajatra fame rohit mane new home in mumbai video shared on social media see details

Video : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याने मुंबईत खरेदी केलं हक्काचं घर, बायकोला दिलं सगळं श्रेय, म्हणाला, "ज्या हिंमतीने तू..."

मराठी मनोरंजनसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, जे मुंबईचे स्थानिक नसून कामानिमित्त मुंबईत येत असतात. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून अनेक कलाकार मंडळी या सिनेसृष्टीत त्यांचे नशीब आजमावण्यासाठी येत असतात. पण मुंबईत त्यांना स्वत:चे घर नसल्यामुळे नातेवाईक किंवा मित्रमंडळींकडे राहावं लागतं. त्यामुळे मुंबईत घर घेणे हे त्यांचे स्वप्न असते आणि याच स्वप्नपूर्तीसाठी ते कलाकार मेहनत घेत असतात. असेच नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झालेला अभिनेता म्हणजे रोहित माने.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून ‘साताऱ्याचा विनोदी तारा’, ‘देशी हॉटनेस’ अशा अनेक बिरुदांनी लोकप्रिय असलेल्या रोहित मानेने त्याच्या नवीन घराची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ शेअर करत घराची झलकही दाखवली आहे. या पोस्टखाली त्याने असे म्हटले आहे की, “मी साताऱ्यात जन्माला आलो. तिथेच वाढलो. माझे वडील कामानिमित्त मुंबईत असायचे आणि आम्ही गावी. कुटुंबापासून किती दिवस लांब राहायचं म्हणून माझ्या बाबांनी आम्हाला मुंबईत आणलं. लहानपणापासून आम्ही बऱ्याच घरांमध्ये राहिलो, काही घरं आवडत नसतानाही नाईलाज म्हणून राहावं लागलं आणि काही घरं खूप आवडत असतानाही नाईलाज म्हणून सोडावी लागली. त्या सगळया प्रवासात एक स्वप्न कायम सोबत असायचं आणि ते म्हणजे स्वतःचं हक्काचं घर असावं जे नाईलाज म्हणून सोडावं लागणार नाही आणि मनासारखं सजवता येईल”.

View this post on Instagram

A post shared by Rohit Mane (@mane_ya._.na_mane)

आणखी वाचा – “स्वतःच्या घरात…”, माथेरानमध्ये सर्वत्र कचरा पाहून भडकली जुई गडकरी, व्हिडीओही केला शेअर, म्हणाली, “कचऱ्याने व्यापलेली सुंदर ठिकाणं…”

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “बरं त्यात निवडलेलं क्षेत्र इतकं अनप्रेडिक्टेबल आहे की, कधी घर घेण्याची हिंमतही झाली नाही. पण श्रदधा तुझ्याबरोबर लग्न झालं आणि ज्या हिंमतीने तू सगळं हातात घेतलंस त्यामुळे आणि त्यामुळेच हे शक्य झालं आहे. ही हिंमत आम्हाला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने दिली. आता मी हक्काने सांगू शकतो होय हे आमचं घर आहे. स्वप्नपूर्तीचा हाच तो अनुभव”.  

आणखी वाचा – “तेव्हा चिपळूण सोडून मुंबईत आले अन्…”, आई-वडिलांपासून कित्येक वर्ष दूर राहणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीची भावुक पोस्ट, म्हणाली, “७ वर्ष…”

यापुढे त्याने त्याच्या नवीन घराबद्दल आई-वडिल, सासू-सासरे यांचे आभार मानत असे म्हटले आहे की, “या सगळयात माझे आई-वडील, माझे सासू-सासरे, यांनी कायमच आम्हाला दिलेली साथ मी कधीच विसरु शकणार नाही. तुम्हा सगळ्यांचे आर्शिवाद आणि शुभेच्छा कायम आमच्या सोबत असू दया. कायम असंच प्रेम करत रहा. या प्रवासात बरोबर असणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही आभारी आहोत. एका स्वप्नाचा प्रवास पूर्ण होत आहे. पुढच्या स्वप्नांकडे जाण्याचा ध्यास ठेवून…”. दरम्यान, रोहितने पोस्ट शेअर करताच त्याच्यावर अक्षया गुरव, पृथ्वीक प्रताप, प्रथमेश परब, रसिका वेंगुर्लेकर, ऋतुजा बागवे, स्नेहल शिदम यांमसारख्या अनेक कलाकारांनी व चाहत्यांनी कमेंट्सद्वारे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Sania mirza father recation on shoaib malik third marriage with sana javed see the details

"घटस्फोट घेण्याचा निर्णय...", शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नाबाबत सानिया मिर्झाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, "एखादी स्त्री..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.