कलाकार मंडळींनी एखादी हटके फॅशन केली की त्यांचे चाहते ही ती फॅशन लगेचच फॉलो करतात. कपडे, दागिने अशा वेगवेगळ्या फॅशन ही कलाकार मंडळी करत असतात. आणि या फॅशनने ते प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडतात. अशातच पुन्हा एकदा एका हटके स्टाईलच्या मंगळसूत्राची चर्चा सुरु झाली आहे. अर्थात नववधूच्या गळ्यातील मंगळसूत्राच्या डिझाइनने ही चर्चा रंगली आहे. आणि या चर्चेला उधाण आलेलं पाहायला मिळालं. (Akshaya Devdhar Mangalsutra)
गेल्या वर्षभरात अनेक कलाकार जोड्या या लग्नबंधनात अडकल्या. दरम्यान या नववधूंच्या लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अशातच अभिनेत्रींच्या गळ्यातील मंगळसूत्र हे प्रेक्षकांसाठी अधिक खास ठरलं. कारण प्रेक्षक या हटके मंगळसूत्राच्या डिझाइन्स फॉलो करताना दिसले. आजवर ऋता दुर्गुळे, अभिज्ञा भावे, मिताली मयेकर, शिवानी रांगोळे या अभिनेत्रींच्या मंगळसूत्राची विशेष चर्चा रंगली. त्यानंतर आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या मंगळसुत्रचा डिझाईनने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर.

अभिनेत्री अक्षया देवधर व हार्दिक जोशी यांनी २ डिसेंबर २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली ‘राणादा-पाठकबाई’ ही ऑन स्क्रीन जोडी ऑफ स्क्रीन एकत्र येत लग्नबंधनात अडकली. त्यांच्या लग्नाला दोन वर्ष झाली असून सध्या ही जोडी त्यांच्या वैवाहिक आयुष्याचा आनंद लुटत आहेत. नेहमीच दोघेही एकत्र फिरतानाचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात.
अशातच अक्षयाने सोशल मिडियावरुन डिनर डेटचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोचं वैशिष्ट्य म्हणजे अक्षयाच्या गळ्यातील नवं मंगळसूत्र आणि त्या नव्या मंगळसूत्राची खास डिझाईन. अभिनेत्रीच्या मंगळसूत्रातील पेंडंट हे डायमंड्स (हिऱ्यांनी) भरलेल आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीच्या मंगळसुत्रात काळ्या मण्यांनादेखील तितकेच महत्त्वाचे स्थान दिले असल्याचे पाहायला मिळत आहे. अक्षयाचे हे सुंदर मंगळसूत्र पेंडंटसारखे असल्याचेही दिसत आहे.