Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ च्या नुकत्याच समोर आलेल्या भागात विकी जैन व मुन्नवर फारुकी यांच्यात जोरदार भांडण केलेलं पाहायला मिळालं. टॉर्चर टास्क या खेळाचा दुसरा भाग सुरु होण्यापूर्वी एका संघाने मसाले, बादल्या आणि इतर काही वस्तू लपवल्या यावरुन त्यांच्यात खूप मोठा वाद झालेला पाहायला मिळाला. यानंतर ‘बिग बॉस’ने मुन्नवर, अभिषेक, मन्नारा व अरुण यांना अर्काइव्ह रूममध्ये बोलावले. विकी, अंकिता, आयेशा व ईशा यांनी मिरची पावडर टाकून त्याचा छळ केला त्या टास्कमधील एक क्लिप त्यांना दाखवण्यात आली. आणि दुसरी क्लिप विकी व त्यांच्या टीमने सर्वकाही कसे लपवले आणि त्यांनी गोष्टी कुठे लपवल्या याबद्दल होती.
यानंतर ‘बिग बॉस’ने टीम ए ला काय करावे याचा पर्याय दिला. दरम्यान ‘बिग बॉस’ने त्यांना दोन पर्याय दिले. पहिला ‘बिग बॉस’ त्यांना सर्व रेशन परत देईल आणि त्यांना ३० मिनिटांत त्यांच्या विरोधकांचा पराभव करायचा आहे. दुसरा पर्याय, “‘टीम ए’च्या चुका दाखवत त्यांचा पराभव करुन तुम्ही फिनालेला पोहोचून दाखवा” यावेळी अंकिता व ईशाला खात्री होती की मुन्नवर व त्याची टीम दुसरा पर्याय निवडतील कारण त्यांना माहित होते की मुन्नवरची टीम त्यांना हरवू शकत नाही.
यानंतर ‘बिग बॉस १७’ च्या नवीन प्रोमोमध्ये अंकिता मुन्नवरला टोमणे मारताना दिसते की त्याने तिच्याशी असे का केले. ती म्हणते, कायर मुन्ना, फत्तू मुन्ना. मुन्नवर मात्र अंकिताच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि या मुद्द्यावरून त्यांच्यात भांडण होते. अंकिता मुन्नवरला म्हणते, “हे तुझं खरं रूप आहे, जेव्हा मन्नारा तुझ्यासाठी रडायची ते आज मला कळत आहे. तू वाईट माणूस आहेस”. यावर मुन्नवर हसतो आणि म्हणतो, “खूप त्रास होत आहे, होऊ दे”.
अंकिता व मुन्नवर हे ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून मित्र होते. त्यांच्यात मैत्रीपूर्व असं घट्ट नातं होतं आणि अंकिता मुन्नवरला भाऊ मानायची. मात्र, टॉर्चर टास्कदरम्यान झालेल्या संघर्षानंतर मुन्नवरची बदलेली वागण्याचाही पद्धत पाहता अंकिताला आश्चर्य वाटले. आणि त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद सुरु झाला.