शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

१००व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनासाठी मराठी कलाकारांची तुफान गर्दी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदें व शरद पवार यांची विशेष उपस्थिती

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 6, 2024 | 5:22 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
100th akhil bhartiya natya sammelan inaugurated by chief minister eknath shinde

१००व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनासाठी मराठी कलाकारांची तुफान गर्दी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदें व शरद पवार यांची विशेष उपस्थिती

चिंचवड येथील आद्य नाटककार विष्णूदास भावे नगरीत सुरू झालेल्या शंभराव्या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन ९९व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरद पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, शंभराव्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले आदि मान्यवर मंडळी याप्रसंगी नाट्यसंमेलनाला उपस्थित होती. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी त्यांचे विचार प्रकट केले.

यावेळी बोलताना संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरद पवार यांनी “वृद्ध कलाकारांच्या मानधनात वाढ करावी, घरकुल योजना करावी, नाट्यगृहाच्या भाड्याबाबतीत विचार करावा, यांसाठी विशेष अनुदान देण्यात यावे” असा प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “शंभरावे संमेलन दोन वर्षांपूर्वी होणे अपेक्षित होते. परंतु, करोनामुळे झाले नाही. कदाचित नियतीच्या मनात असेल की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरच शंभरावे संमेलन व्हावे आणि १००व्या संमेलनाला मला मुख्यमंत्री म्हणून उपस्थित राहता आले” अशी फटकेबाजी केली.

आणखी वाचा – “माईकवरून भसाड्या आवाजात…”, घराशेजारी कित्येक दिवस जत्रा भरल्याने सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला त्रास, म्हणाली, “का सहन करायचं?”

तसेच नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी “आम्ही कलाकार तीन तास अभिनय करतो. पण २४ तास अभिनय करणारी मंडळी मंचावर आहेत. ते ३६५ दिवस अभिनय करत असतात. तसेच नाट्य परिषद अध्यक्षपद मिळाल्याने मला मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटत आहे” अशी मिश्किल टिपणी केली. तर डॉ. जब्बार पटेल असे म्हणाले की, “माझ्या आजवरच्या प्रवासात अनेक दिग्गजांचे योगदान आहे. नाट्यसृष्टीचे अनेक प्रश्न आहेत. राज्य सरकारने प्रत्येक विद्यापीठाच्या नाट्य विभागाला अनुदान दिले पाहिजे. तसेच इथे सादर होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नाटकांना सेन्सॉरशिप लावू नये.”

आणखी वाचा – “माईकवरून भसाड्या आवाजात…”, घराशेजारी कित्येक दिवस जत्रा भरल्याने सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला त्रास, म्हणाली, “का सहन करायचं?”

सनई चौघड्यांचा मंगलमयी स्वर, लेझीम, ढोलताशांचा गजर, रांगोळ्या, पायघड्या, झब्बा-धोतर, नऊवारी साडी, फेटा असा मराठमोळा पेहराव केलेल्या अनेक मराठी कलाकारांनी नाट्यदिंडीमध्ये सहभाग घेतला होता. या दिंडीमध्ये अभिनेत्री कविता लाड, संदीप पाठक, अभिनेता सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, शुभांगी गोखले, तेजश्री प्रधान, सुरेखा कुडची, प्रतीक्षा लोणकर, कांचन अधिकारी, निर्मिती सावंत, अमृता सुभाष, प्रिया बेर्डे, वर्षा उसगावकर, स्पुहा जोशी,  सुकन्या मोने, सविता मालपेकर तसेच सुशांत शेलार, चेतन दळवी, संजय मोने, वैभव मांगले, उमेश कामत, संजय खापरे, सुयश टिळक, पुष्कर श्रोत्री, संदीप पाठक यांसह अनेक प्रसिद्ध कलाकार सहभागी झाले.

Tags: 100th akhil bhartiya natya sammelanactor prashant damlechief minister eknath shindemarathi entertainment newsMarathi newssharad pawarअखिल भारतीय नाट्य संमेलनप्रशांत दामलेमराठी बातमीमुख्यमंत्री एकनाथ शिंदेशरद पवार
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Actress madhuri dixit take ukhana for an audience and shriram nene also took the name

“पुणे तिथे काय उणे इथे...”, भर थिएटरमध्ये माधुरी दीक्षितचा नवऱ्यासाठी खास उखाणा, नेनेंनीही घेतलं नाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.