Nupur Shikhare and Ira Khan Marriage : आमिर खानच्या लेकीचा शाही विवाहसोहळा नुकताच संपन्न झाला आहे. ३ जानेवारी रोजी आयरा खान व नुपूर शिखरे यांच्यासह लग्नबंधनात अडकली आहे. आयराने तिच्या बॉयफ्रेंडसह लग्नगाठ बांधली आहे. दोन तीन दिवसांपासून आयरा व नूपुरच्या लग्नाची धामधूम सुरु असलेली पाहायला मिळत होती. कुटुंब व मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत या दोघांचा लग्नसोहळा पार पडला. आमिर खानच्या लेकीच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
आयरा खानच्या लग्नाला आमिर खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी किरण राव व रीना दत्ता यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. दोघींनी लग्नापुर्वीच्या विधींपासूनच साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होत. नुपूर शिखरेकडे हळदी समारंभालाही दोघींनी उपस्थिती दर्शविली. यावेळी किरण राव व रीना दत्ता यांचा नऊवारी साडीतील महाराष्ट्रीयन लूक लक्षवेधी ठरला. खान कुटुंबियांच्या लग्नात सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार मंडळींनीही उपस्थिती दर्शविली होती. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अंबानी परिवाराने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
खान परिवाराच्या या आनंदाच्या क्षणात अंबानी कुटुंबीयांनी सहभाग दर्शविला. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे, या व्हिडीओमध्ये आमिर खान व त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव या त्यांचे प्रमुख पाहुणे मुकेश अंबानी व नीता अंबानी यांना मिठी मारत त्यांचं स्वागत करताना दिसल्या. शेरवानी-धोती आणि डोक्यावर फेटा असलेला आमिरचा लूक कौतुकास्पद होता. तर गोल्डन रंगाची साड़ी आणि ग्रीन डिझाईनर ब्लाऊजमध्ये किरण रावचा लूकही लक्षवेधी ठरला.
समोर आलेल्या माहितीनुसार कोर्ट मॅरेजकेल्या नंतर आता या जोडीचा ८ जानेवारीला उदयपुरमध्ये शाही रिसेप्शन सोहळा होणार आहे. नोंदणी पद्धतीने लग्न करण्यासाठी नवरा मुलगा नुपूर शिखरे तब्बल आठ किलोमीटर धावत येत लग्नमंडपात पोहोचला. लग्नमंडपात पोहोचल्यावर नुपूर त्याच्या मित्र परिवारासह वरातीमध्ये थिरकला.