Gautami Deshpande and Swanand Tendulkar Marriage : अभिनेत्री गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकर ही जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली. गौतमीने स्वानंदसह सात फेरे घेत लगीनगाठ बांधली आहे. नुकतेच त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. काही दिवसांपासून गौतमी व स्वानंद यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. त्यांनतर थेट मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर करत त्यांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली. शिवाय गौतमी व आशिष यांच्या हळदी समारंभाच्या फोटोंनीही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
अखेर आता गौतमी व स्वानंद विवाहबंधनात अडकले आहेत. गौतमी-स्वानंदच्या लग्नाच्या सजलेल्या मंडपाचा फोटोही समोर आला आहे. निसर्गरम्य वातावरणात अगदी शाही थाटामाटात त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. पुण्यातील एका रिसॉर्टमध्ये त्यांचा विवाहसोहळा उरकला आहे. वाईल्डरनेस्ट रिसॉर्ट, खडकवासला येथे गौतमी व स्वानंदच लग्न झालं आहे. कुटुंबीय, तसेच जवळचे नातेवाईक व सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींच्या उपस्थितीत गौतमी-स्वानंदचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला आहे.
अभिनेत्री गौतमी देशपांडे ही मराठी सिनेसृष्टीतील काही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. छोट्या पडद्यावरील ‘माझा होशील ना?’ या मालिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते आणि गेले काही दिवस ती आणखीणच चर्चेत आली आहे आणि या चर्चेचं मुख्य कारण म्हणजे तिचं लग्न. अभिनेत्री गेले काही दिवस तिच्या लग्नामुळे सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय झाली आहे. अखेर स्वानंदी लग्नबंधनात अडकली आहे.
अभिनेत्री इन्फ्लुएंसर स्वानंद तेंडुलकरबरोबर रिलेशनमध्ये होती. काही दिवसांपूर्वी त्यांच्या रिलेशनशिप बद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र गौतमीने याबद्दल कुठेही भाष्य केले नव्हते. पण गौतमीची बहीण मृण्मयीने त्यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात केल्यामुळे त्यांच्या रिलेशनविषयी व लग्नाविषयी साऱ्यांनाच खबर लागली. अशातच शनिवारी (२३ डिसेंबर) रोजी गौतमीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे मेहेंदी सोहळ्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत अप्रत्यक्षपणे आपल्या प्रेमाची कबुलीदेखील दिली.