मराठी मनोरंजनसृष्टीमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. मनोरंजन विश्वातील प्रसाद जवादे व अमृता देशमुख, सुरुची अडारकार व पियूष रानडे या जोड्या नुकत्याच विवाहबंधनात अडकल्या. नुकतंच ‘सारेगमप’ लिटिल चॅम्प्समधील गायिका मुग्धा वैशंपायनच्या मोठ्या बहिणीचे लग्नदेखील पार पडले. या लग्नाच्या तयारीमध्ये मुग्धा चांगलीच व्यस्त होती. ताईच्या हळदीचे, मेहंदीचे, ग्रहमख, लग्नाचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत होती. अशातच आता तिच्या लग्नाचीही तयारी सुरू झाली आहे. (Mugdha Vaishampayan On Instagram)
ताईच्या लग्नानंतर आता मुग्धाच्या लग्नालाही सुरुवात झाली आहे. मुग्धाने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यात तिच्या अंगाला हळद लागली असल्याचे दिसत आहे. यावरून त्यांच्या लग्नाआधीच्या विधीना सुरुवात झाली आहे. “हरिद्रा लापन । घाणा भरणे” असं कॅप्शन देत तिने तिच्या हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत. मुग्धाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावर आनंद खुलून दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर लग्नाचे तेज दिसून येत आहे.
आणखी वाचा – “नवीन आयुष्य, लावूया नवीन रोप…”, पियूष रानडेचा बायकोसाठी खास उखाणा, पाहा खास व्हिडीओ
काही दिवसांपूर्वी मुग्धा व प्रथमेश यांनी सोशल मीडियावरून दोघांचा एकत्र फोटो शेअर करत ‘आमचं ठरलं’ असं म्हणत चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. तेव्हापासून मुग्धा व प्रथमेश यांच्या लग्नाकडे साऱ्यांचचं लक्ष लागून राहिलं आहे. मुग्धा व प्रथमेश यांच्या केळवणाचेही बरेच फोटो समोर आले. मुग्धा व प्रथमेश सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. त्यांच्या लग्नाच्या आधीच्या प्रत्येक विधीचे खास क्षण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्रथमेशनेही त्याच्या सोशल मीडियाद्वारे लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. अशातच आता त्यांचा हळदीचा एक फोटो समोर आला आहे. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरम्यान गेले काही दिवस त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अशातच या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच त्यांचे अनेक चाहते मंडळी या लग्नासाठी आतुर आहेत.