शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘या’ आठवड्यात प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार या नव्या वेबसीरिज व चित्रपट, पाहा संपूर्ण यादी

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 18, 2023 | 12:42 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
'या' आठवड्यात प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार या नव्या वेबसीरिज व चित्रपट, पाहा संपूर्ण यादी

amazon prime netflix hotstar new upcoming ott movies and series see the details

ओटीटीचे विश्व म्हणजे घरबसल्या अक्षरशः मनोरंजनाचा खजिनाच आहे. अनेकांना चित्रपटगृहात जाऊन मनोरंजनाचा आस्वाद घेता येणे शक्य नसते. त्यामुळे काहीजण घरबसल्या ओटीटीच्या अनेक प्लॅटफॉर्म्सवर मनोरंजनाचा आनंद घेतात. ओटीटीवर जुन्या प्रसिद्ध चित्रपटांपासून ते काल-परवा आलेल्या चित्रपटापर्यंत सगळंच पाहता येतं. अशातच ख्रिसमस व सणासुदीचा हंगाम जवळ आल्याने, तसेच वर्षाअखेरचा वीकेण्ड जवळ आल्याने या वीकेण्डमध्ये मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी अनेक चित्रपट आणि सिरीज ओटीटीवर उपलब्ध आहेत. (Upcoming Series And Movies)

(१) चित्रपट : पर्सी जॅक्सन आणि ऑलिंपिय

दिग्दर्शक : रिक रिओर्डन, जोनाथन ई. स्टीनबर्ग

कलाकार : वॉकर स्कोबेल, लेह सावा जेफ्रीज, आर्यन सिम्हाद्र, व्हर्जिनिया कुल, ग्लिन टर्मन, जेसन मँट्झौकस

प्रदर्शनाची तारीख : २० डिसेंबर २०२३

ओटीटी प्लॅटफॉर्म : डिस्नी प्लस हॉटस्टार

(२) चित्रपट : मिशन स्टार्ट अब

दिग्दर्शक : इंद्राणी रे

कलाकार : कुणाल बहल, अनिशा सिंग, मनीष चौदार, सायरस, मसाबा गुप्ता

प्रदर्शनाची तारीख : १९ डिसेंबर २०२३

ओटीटी प्लॅटफॉर्म : अमेझोन प्राइम व्हिडीओ  

कथा : या सिरीजमध्ये तीन गुंतवणूकदार असतात, जे सुरुवातीच्या टप्प्यातील दहा उत्कृष्ट संस्थापकांची निवड करतात आणि त्यांच्या उद्योजकीय कौशल्याची चाचणी घेतात. त्यानंतर त्या संस्थापकांना कठोर आव्हानांचा सामना करावा लागतो. मग त्यातील काही संस्थापकांना त्यांच्या स्टार्टअपसाठी संभाव्य गुंतवणूक मिळवण्याची संधी मिळते. 

(३) चित्रपट : लाइक फ्लोअर्स इन सॅंड  

दिग्दर्शक : किम जिन-वू

कलाकार : जँग डोंग-युन, ली जू-म्योंग, यून जोंग-सेओक, किम बो-रा, ली जे-जून, ली जू-सेंग

प्रदर्शनाची तारीख : २१ डिसेंबर २०२३

ओटीटी प्लॅटफॉर्म : नेटफ्लिक्स

कथा : या चित्रपटाची कथा किम बेक-डू (जँग डोंग-युन) चे अनुसरण करते. जो एक सायरियम खेळाडू आहे. किमने खेळातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला, परंतु जेव्हा तो त्याच्या बालपणीचा मित्र ओह यू-क्युंग (ली जू-म्योंग) बरोबर पुन्हा एकत्र येतो. तेव्हा काही गोष्टींना नवीन वळण मिळते. ओहने त्याच्या मित्राच्या सायरियम संघासाठी व्यवस्थापन संघाचा नेता बनण्याचा निर्णय घेतो. मिन ह्यून-वूक (युन जोंग-सेओक) व जू मी-रॅन (किम बो-रा), तसेच नवीन प्रशिक्षक क्वाक जिन-सू यांची मदत घेतो (ली जे-जून) आणि बेक-डूचा जिवलग मित्र जो सीओक-ही (ली जू-सेंग) संघाला विघटन होण्यापासून वाचवण्यासाठी एकत्र काम करतो.

(४) चित्रपट : आल्हामुर एच. ए.

दिग्दर्शक : अब्दुललाह अलकुराशी

कलाकार : फहाद अलकाहतानी, खालेद येस्लाम, अली अल्शेरीफ, इस्माईल अलहसन, फातिमा अलबनावी, खैरिया अबू लबान, मोहम्मद अलकास

प्रदर्शनाची तारीख : २१ डिसेंबर २०२३

ओटीटी प्लॅटफॉर्म : नेटफ्लिक्स 

कथा : या चित्रपटाची कथा सत्यघटनेवर आधारित असून एका सुरक्षा रक्षकाभोवती ही कथा फिरते. हा सुरक्षारक्षक अचानक अब्जाधीश होतो. यानंतर त्याचे सहभागी मित्र एक योजना आखतात व त्यांना पैसे दुप्पट करण्याचे आश्वासन देतात. नंतर एका मोठ्या गुंतवणुकीत पैसे साठवण्यासाठी ते लोकांना पटवून देतात. त्यांच्याकडून पैसे काढून मग ते त्यांची फसवणूक करतात.

(५) चित्रपट : पर्सी जॅक्सन आणि ऑलिंपिय

दिग्दर्शक : रिक रिओर्डन, जोनाथन ई. स्टीनबर्ग

कलाकार : वॉकर स्कोबेल, लेह सावा जेफ्रीज, आर्यन सिम्हाद्र, व्हर्जिनिया कुल, ग्लिन टर्मन, जेसन मँट्झौकस

प्रदर्शनाची तारीख : २० डिसेंबर २०२३

ओटीटी प्लॅटफॉर्म : डिस्नी प्लस हॉटस्टार  

कथा : चित्रपटाची कथा ही एक १२ वर्षांच्या पर्सी जॅक्सनभोवती फिरते. पर्सीला त्याच्या नवीन सापडलेल्या अलौकिक शक्तींशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असताना, आकाश देव झ्यूस त्याच्यावर मास्टर लाइटनिंग बोल्ट चोरल्याचा आरोप करतो. स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी, पर्सीने आता बोल्ट शोधण्यासाठी आणि ऑलिंपसची सुव्यवस्था पुनर्संचयित करण्यासाठी संपूर्ण अमेरिकेत प्रवास् या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.  

https://youtu.be/uHb7au6Gmls?si=LafT92T6lSRt9iuA

(६) चित्रपट : वंडरहॅचचे ड्रॅगन

दिग्दर्शक : केंटारो हागीवारा, ताकाशी ओत्सुका

कलाकार : मॅकेन्यु, सेना नाकाजिमा, डायकेन ओकुडायरा, गो मोरिता, सुमिरे, रेना तनाका मसाकी मिउरा, रिको नरुमी

प्रदर्शनाची तारीख : २० डिसेंबर २०२३

ओटीटी प्लॅटफॉर्म : डिस्नी प्लस हॉटस्टार  

कथा : ही कथा नागी नावाच्या विद्यार्थिनी आहे. काही कारणांमुळे तिचे तिच्या वर्गमित्रांशी जुळत नाही. त्यामुळे ती तिच्या स्वतःच्या काल्पनिक जगात राहते आणि तिला कुठून तरी विचित्र आवाज येत असल्याचे जाणवते. त्यानंतर ती दुसर्‍या जगात राहणाऱ्या टायमला भेटते. त्या जगात ड्रॅगनराईडर्स असतात आणि ती त्यांच्याशी संवाद साधत असल्याचे यात दाखवण्यात आले आहे.  

Tags: amazon prime videobollyeoodbollywood newsentertainmententertainment newsnetflixottott release
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Sukanya Kalan Engagement

मराठी अभिनेत्री व नृत्यांगणा सुकन्या काळणचा थाटामाटात साखरपुडा, कुशल बद्रिकेची पत्नीसह हजेरी, पाहा खास फोटो

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.