आपल्या मनमोहक सौंदर्याने व सुमधुर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणारी अभिनेत्री व गायिका म्हणजे आर्या आंबेकर. आर्या ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स्’ या लोकप्रिय कार्यक्रमामधून घराघरांत पोहोचली व लोकप्रिय झाली. तिने आजवर अनेक गाण्यांसाठी पार्श्वगायन करत प्रेक्षकांच्या मनावर तिच्या आवाजाची छाप पाडली आहे. आर्याच्या गाण्यांची जितकी चर्चा होते. तितकीच ती तिच्या मनमोहक सौंदर्यानेदेखील चर्चेत असते. आर्या तिच्या सोशल मीडियावर अनेक स्टायलिश फोटो शेअर करत असते त्याचबरोबरबर गाण्याचे काही व्हिडीओही शेअर करत असते. अशातच तिने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे ती चर्चेत आली आहे.
नुकतंच आर्याने तिच्या सोशल मीडियाद्वारे एक व्हिडीओ शेअर करत तिच्याबरोबर झालेल्या फसवणुकीबद्दल सांगितले होते. तिच्या लाईव्ह गाण्याच्या कार्यक्रमात तिने गेलेले गाणी काही युट्यूब चॅनेल्सनी स्वत:च्या वाहिनीवर पोस्ट केली आणि या सगळ्याचा मनस्ताप व्यक्त करत आर्याने व्हिडीओ पोस्ट केला होता. “मी माझ्या कॉन्सर्टमध्ये गायलेल्या काही गाण्यांचे व्हिडीओ लोकांनी त्यांच्या युट्यूबवर पोस्ट केले. त्या व्हिडीओमधून माझा आवाज वेगळा करून ‘लेटेस्ट मराठी कीर्तन’ नावाच्या एका म्युजिक लेबलने अनेक गाण्याच्या प्लॅटफॉर्म्सवर त्यांच्या स्वतःच्या कॉपीराइटसकट आपलोड केले आणि हे सगळ माझ्या परवानगीशिवाय करण्यात आले आहे” असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी व चाहत्यांनी तिच्याबरोबर झालेल्या या प्रकरणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच अनेकांनी तिला यासाठी पाठिंबा दिला आहे. पण आर्याने हा व्हिडीओ इंग्रजी भाषेत केल्यामुळे तिला अनेकांनी ट्रोलदेखील केले. मराठी गाणी म्हणता पण व्हिडीओ इंग्रजीत का केला असं म्हणत तिच्यावर टीका करण्यात आली. यावर तिने एक पोस्टद्वारे भाष्य केले आहे. या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे, “मी मराठीमध्ये बोलले नाही म्हणून जे लोक नाराजी व्यक्त करत आहेत, त्यांना मला एक सांगावसं वाटत आहे की, मला तुमच्या भावना कळत आहेत. पण माझ्याबरोबर झालेली ही फसवणूक इतर भाषेतील कुठल्याच गायकांबरोबर व्हायला नको असं मला मनापासून वाटतं आणि त्यासाठीच सगळ्यांना कळेल अशा इंग्रजी भाषेत मी व्हिडीओ केला आहे. प्रत्येक म्युजिशियनला अशा प्रकरणांपासून सतर्क करणे हा या व्हिडीओचा मुख्य उद्देश आहे. तरीही तुमच्या भावना दुखावल्यामुळे मी माफी मागते. पण तुम्हीसुद्धा मुख्य मुद्दा काय आहे ते समजून घेतलत तर मला बरं वाटेल.”
आणखी वाचा – सदाशिव अमरापुरकर यांच्या घराला आग, एक जण जखमी, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, अन्…
दरम्यान, या सगळ्या प्रकरणात मला मदत केलेल्या सर्वांनाचं तिने धन्यवाद म्हटले आहे. तसेच नेटकऱ्यांनी व चाहत्यांनी तिच्या याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच भाषेवरून कमेंट करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करत तू तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर असं म्हणत तिला पाठिंबा दिला आहे.