कलाकार मंडळी म्हटलं की त्यांना ट्रोलिंगचा सामना हा करावाच लागतो. बरेचदा हे कलाकार त्यांच्या वैयक्तिक, तसेच व्यावसायिक गोष्टींमुळे नेटकऱ्यांच्या कचाट्यात सापडतात. कित्येकदा ही कलाकार मंडळी नेटकऱ्यांना उत्तर देतात, तर काही कलाकार ट्रोलिंगकडे जाणूनबुझून दुर्लक्ष करतात. अशातच एक अभिनेत्री ट्रोलिंगच्या कचाट्यात अडकली असल्याचं समोर आलं आहे. (Neha Pendse Troll)
मराठी मनोरंजनसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या मराठीतील अभिनयाबरोबरच इतर भाषिक इंडस्ट्रीमध्येसुद्धा कार्यरत आहेत. त्यातीलचं एक अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. नेहाने मराठीबरोबरचं हिंदीमध्येही बरेच काम केले आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्याही बरीच मोठी आहे. नेहा तिच्या व्यावसायिक आयुष्यासह तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही नेहमीच चर्चेत असते.
नेहा पेंडसेने नुकतीच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमावेळी तिने वाईन कलरचा एक गाऊन परिधान केला होता. त्याबरोबर तिने गळ्यात डायमंड नेकलेस आणि हातात त्याचं रंगाची अंगठी परिधान केली होती. या लूकमध्ये नेहाचा ग्लॅमरस लूक साऱ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. मात्र तिच्या या लूकमुळे ती ट्रोल झाली आहे.

तिच्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. “सांभाळता येत नसेल तर चादरीसारखा ड्रेस का परिधान केलास”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने, ““ही काय फॅशन आहे, वाचव देवा”, असे म्हटले आहे. तर एकीने “मांडी दाखवणं इतकं गरजेचं आहे का? ड्रेस ताणून ताणून बाजूला केलाय”, असे म्हटले आहे. तर एकाने “कम्फर्टेबल असायला असे कपडे घालता की अनकम्फर्टेबल व्हायला”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.