रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हद्द झाली तुम्ही…”, ज्युनिअर महमूद यांच्या अंत्यदर्शनाला जॉनी लिव्हर यांनी केलेल्या कृतीमुळे नेटकरी भडकले, म्हणाले, “ही फोटोसेशनची वेळ…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 8, 2023 | 5:23 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Junior Mehmood funeral

"हद्द झाली तुम्ही...", ज्युनिअर महमूद यांच्या अंत्यदर्शनाला जॉनी लिव्हर यांनी केलेल्या कृतीमुळे नेटकरी भडकले, म्हणाले, "ही फोटोसेशनची वेळ..."

अभिनेते ज्युनिअर महमूद यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गुरुवारी मध्यरात्री २च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ६७व्या वर्षी त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांचा कॅन्सर चौथ्या स्टेजपर्यंत पसरला होता आणि त्यामुळे त्यांचं वजनही सतत कमी होत होतं. मात्र हा लढा ते फार काळ लढू शकले नाहीत. शुक्रवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर सांताक्रूझच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले आहेत. (Junior Mehmood funeral)

दरम्यान, त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार मंडळींनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. जॉनी लिव्हर, राकेश बेदी, सुदेश भोसले, आदित्य पांचोली, अवतार गिल, रझा मुराद यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी शुक्रवारी दिवंगत ज्येष्ठ अभिनेते ज्युनियर महमूद यांच्या राहत्या घरी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. कॅन्सरच्या चौथ्या टप्प्याशी झुंज देत ज्युनियर महमूद यांचं निधन झालं. जॉनी लिव्हर यांनी ज्युनियर मेहमूदच्या घरी त्यांची मुलं जेमी लिव्हर व जेसी लिव्हर यांच्यासह हजेरी लावली. दरम्यान त्यांनी दिवंगत अभिनेत्याच्या कुटुंबियांसह फोटोही क्लिक केले.

आणखी वाचा – डॉक्टरांनी दिले होते ४७ दिवस, त्याचपूर्वी मृत्यूने गाठलं अन्…; बालपणीच्या मित्राच्या निधनाने सचिन पिळगांवकरांना धक्का, म्हणाले, “त्याच्याबरोबर माझ्या…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

जॉनी लिव्हर यांनी अभिनेत्याच्या कुटुंबासह फोटो क्लिक केल्याने सोशल मीडियावर त्यांना चांगलंच ट्रोल करण्यात आलं. नेटकऱ्यांनी ट्रोल करत, “त्या व्यक्तीचं निधन झालं आहे, आणि हे लोक फोटोशूट करत आहेत, हद्द झाली” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एकाने कमेंट करत, “यांचं फोटोशूट केव्हा बंद होणार” अशी कमेंट केली आहे. दरम्यान ज्युनिअर महमूद यांच्या आजाराचं वृत्त समोर येताच अभिनेता जॉनी लिवर यांनी त्यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली होती.

आणखी वाचा – Video : आमिर खानच्या लेकीची हटके लग्न पत्रिका, व्हिडीओ पाहून सगळेच चक्रावले, नक्की काय आहे खास?

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

ज्युनिअर महमूद हे ‘दो और दो पांच’, ‘ब्रह्मचारी’, ‘मेरा नाम जोकर’, ‘परवरिश’, ‘कटी पतंग’ यांसारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी विविध भाषांमधील २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.

Tags: entertainmentjohny leverjohny lever trolljunior mehmood deathJunior Mehmood funeral
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
bigg boss 17 salman khan shout on abhishek kumar in this weekend ka var new promo is viral on social media

Bigg Boss 17 : ईशाबद्दल अश्लील बोलला, हद्द पार केली अन्...; अभिषेक कुमारवर सलमान खान भडकला, म्हणाला, “तू खोटारडा...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.