शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी नवीन आहे असं मला…”, ‘झिम्मा २’मध्ये काम करण्यावरुन रिंकू राजगुरुचं वक्तव्य, म्हणाली, “सगळ्यांनी अलगदपणे…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 1, 2023 | 5:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rinku Rajguru On Jhimma 2

“मी नवीन आहे असं मला...”, ‘झिम्मा २’मध्ये काम करण्यावरुन रिंकू राजगुरुचं वक्तव्य, म्हणाली, “सगळ्यांनी अलगदपणे...”

‘झिम्मा २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या या उत्सुकतेला पूर्णविराम मिळाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये गर्दी केली आहे. हा चित्रपट सध्या कोटींची कमाई करत असल्याचं पाहायला मिळत आहे. (Rinku Rajguru On Jhimma 2)

पहिला आठवडा पूर्ण होऊन चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण केलं आहे. ‘झिम्मा’ चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘झिम्मा’ चित्रपटात आपल्याला सिद्धार्थ चांदेकर, सुहास जोशी, सायली संजीव, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी व मृण्मयी गोडबोले या कलाकारांचा अभिनय पाहायला मिळाला. तर ‘झिम्मा २’ चित्रपटात सर्व आधीचेच कलाकार असून सोनाली कुलकर्णी व मृण्मयी गोडबोले यांच्या जागी शिवानी सुर्वे व रिंकू राजगुरू यांना घेण्यात आलं. चित्रपटाबाबत रिंकूने एक पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – Animal Vs Sam Bahadur : ‘अ‍ॅनिमल’चा विकी कौशलच्या ‘सॅम बहादूर’ला फटका बसणार?, कोणता चित्रपट ठरणार वरचढ?, आतापर्यंतची कमाई आहे तब्बल…

रिंकूने इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “काय बोलु मी यांच्याबद्दल, या प्रवासात मी नविन आहे, असं मला आजवर कधी जाणवलं नाही. या सगळ्यांसमोर मी आपली इवलुशी,पण या इवलुश्या जिवाला या सगळ्यांनी अगदी अलगदपणे सामावून घेतलं. आपलसं केलं. या प्रवासात तुम्हा सर्वांकडुन खुप शिकले. खूप सुंदर गोष्टी अनुभवायला मिळाल्या. या सगळ्यासाठी सगळ्यांना खुप खूप थॅंक्यु. खूप प्रेम. हेमंत ढोमे दादा थॅंक्यु तू मला ही संधी दिलीस” असं म्हणत तिने सहकलाकारांबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

आणखी वाचा – ‘झिम्मा २’ चित्रपटाची विक्रमी कमाई, सात दिवसांतच कमावले ‘इतके’ कोटी

रिंकूच्या या पोस्टवर तिच्या सहकलाकारांनी कमेंट करत हार्ट ईमोजी शेअर केली आहे. तर रिंकूच्या चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत रिंकूच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. ‘झिम्मा २’ मध्ये रिंकूने निर्मिती सावंत याच्या सुनेची भूमिका साकारली होती. ही भूमिका रिंकूने अगदी उत्तमरित्या निभावली, त्यामुळे सगळीकडे तिचं भरभरून कौतुक होताना पाहायला मिळत आहे.

Tags: entertainmentjhimma 2marathi actressmarathi movierinku rajguru
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
ranbir kapoor rashmika mandana animal movie leaked scenes video viral on social media

रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाला मोठा फटका, ऑनलाईन झाला लीक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.