महाराष्ट्राची हास्यजत्रा हा विनोदी शो नेहमी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज असतो. या शो मधील कलाकार त्यांचं अचूक टायमिंग आणि विनोदी कौशल्य साधत रंगमंचावर धुमाकूळ घालतात. तसेच या कलाकारांच्या स्कीट प्रमाणे चाहत्यांना त्या स्किटमधील जोड्यादेखील तितक्याच आवडतात. अशीच एक जोडी हास्यजत्रेत पाहायला मिळत होती ती म्हणजे विनोदी कलाकार समीर चौगुले आणि विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदार.(vishakha subhedar samir choughule)

हास्यजत्रा कार्यक्रमात आधी समीर आणि विशाखाची(vishakha subhedar samir choughule) जोडी प्रचंड प्रसिद्ध होती. अनेक सिझन या जोडीच्या वेगवेगळ्या स्किटने लोकांना अक्षरशः लोटपोट करून सोडलं होतं. तसेच त्यांनी प्रियकर प्रियसी, बॉस आणि एम्प्लॉय असे अनेक स्कीट गाजवले अस म्हणायला हरकत नाही. विशाखाने हास्यजत्रा सोडली असली तरी समीर आणि विशाखा यांचं बॉण्डिंग मात्र तसंच आहे.पण विशाखाची जागी कोणती विनोदी अभिनेत्री या सगळ्या भूमिका साकारणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते.
====
हे देखील वाचा- ‘कोवळा माल…’ समीरच्या फोटोवर मैत्रिणीची कमेंट
====
सोनी मराठीचा नुकताच एक प्रोमो समोर आलाय. या हास्यजत्रेतील बॉस आणि एम्प्लॉय हे समीर विशाखाने(vishakha subhedar samir choughule) गाजवलेलं स्कीट पाहायला मिळत आहे. यात समीर सोबत विशाखा ऐवजी अभिनेत्री ईशा डे पाहायला मिळत आहे. तसेच या स्कीटमध्ये नवीन बॉसचा उल्लेख देखील केलाय. तर आता विशाखाची जागा ईशा डेने घेतली अस म्हणायला हरकत नाही. तर ईशा डे हे नाव देखील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातूनच घरा घरात पोचलेलं.

अभिनेत्री ईशा देखील तिच्या अभिनय कौशल्याने चाहत्यांना हसवण्यात सरस आहे. तिच्या अनेक भूमिका गाजतात पण ती पहिल्यांदाच विशाखा सुभेदारच्या जागी पाहायला मिळणार म्हणून चाहते देखील हा एपिसोड पाहण्यासाठी उत्सुक झालेत. तर आता ईशा विशाखाची ही आधीची भूमिका नव्या पद्धतीने किती रंजक करणार हे आता उत्सुकतेचं असेल.
यासोबत ईशा भाडीपाच्या 9 to 5 या वेब शो मधून तर ‘आश्रम ३’ वेब सीरिज सिरीज मध्ये बॉबी देओल सोबत झळकली. तर विशाखाने देखील मला नवीन धाटणीच्या भूमिका करायच्या आहे. म्हणून मी हास्यजत्रा सोडते अशी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली होती.