शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शनिशिंगणापूर मंदिराला कळस किंवा घुमट का नाही?, दर्शन घेत अवधूत गुप्तेने सांगितलं खरं कारण, म्हणाला, “अनेक गोष्टी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 18, 2023 | 6:46 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
singer avadhoot gupte shared viedo of shanishingnapur temple with information

शनिशिंगणापूर मंदिराला कळस किंवा घुमट का नाही?, दर्शन घेत अवधूत गुप्तेने सांगितलं खरं कारण, म्हणाला, “अनेक गोष्टी...”

गायक, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, सूत्रसंचालक, परिक्षक व निर्माता अशा अनेक भूमिका लिलया पार पाडणारा कलाकार म्हणजे अवधूत गुप्ते. त्याने आपल्या रांगड्या आवाजाने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. ‘ऐका दाजीबापासून ते माझं कोल्हापूर’ पर्यंत त्याच्या अनेक गाण्यांवर चाहते ठेका धरत असतात. ते सोशल मीडियावरदेखील तितकेच सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे फोटो, व्हिडीओ तसेच कामाबद्दलच्या काही गोष्टी तो नेहमीच चाहत्यांबरोबर शेअर करत त्यांच्या संपर्कात राहत असतो. (Avadhoot Gupte Shared Video On Social Media)

अवधूत गुप्ते एका कार्यक्रमानिमित्त श्रीरामपुरला गेला होता. तेव्हा या कार्यक्रमानंतर त्याने शनिशिंगणापुरलाही भेट दिली. या भेटीचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. दरम्यान या व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. त्याचबरोबर या व्हिडिओखली अवधूतने लिहिलेल्या कॅप्शनमुळे हा व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Avadhoot???? Gupte???? (@avadhoot_gupte)

आणखी वाचा – अमेरिकेत स्थायिक झालेल्या प्रियांका चोप्राने विकलं मुंबईतील घर, एकूण किंमत आहे…

अवधूत यांनी हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, “मध्यंतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीरामपूरला जाणं झालं. तिथून थेट शनिशिंगणापूर गाठलं. माननीय आमदार शंकररावजी गडाख यांच्या सौजन्याने शनि देवाचं आयुष्यात पहिल्यांदाच दर्शन घेतलं.” यापुढे त्याने शनिशिंगणापूर मंदिराबद्दलची माहिती शेअर करत म्हटलं की, “शनिदेव हा सूर्यपुत्र अर्थात सूर्याचा पुत्र आहे. त्यामुळे त्याला नेहमीच सूर्यकिरणांखाली राहायला आवडतं. यामुळेच या मंदिराला घुमट किंवा कळस नाही आणि याचे बांधकामदेखील केलेलं नाही. त्यामुळेच शनिदेवाला हार-फुलं न वाहता तेल वाहिले जाते.” यापुढे त्यांनी आमदार गडाख व त्यांचे स्वीय सचिव अनिलभाऊ यांना धन्यवाद देखील म्हटलं आहे.

आणखी वाचा – ऐश्वर्या शर्मा व नील भट्ट महिन्याला कमावतात इतके रुपये, एका एपिसोडसाठी घेतात तब्बल इतकी रक्कम

अवधूत गुप्तेने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स-कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. सध्या ते कलर्स वाहिनीवरील ‘सुर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमातून ते स्पर्धकांना गायनाविषयी मार्गदर्शनही करतात.

Tags: avadhoot guptemarathi entertainmentMarathi newsmarathi singersinger
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Which Cooking Oil Is Good
Lifestyle

‘या’ तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकाधिक वाढतंय, जेवणात कोणतं तेल वापरणं अधिक उत्तम?, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार…

मे 8, 2025 | 7:00 pm
Video Viral From Pakistan
Social

“आम्ही भारताला थांबवूच शकलो नाही आणि…”, पाकिस्तान नागरिकाकडूनच भारताचा जयजयकार, पाक सैन्याचं सत्य समोर आणत…

मे 8, 2025 | 4:00 pm
Next Post
actress harshada khanvilkar shared prasad jawade and amruta deshmukh wedding photo on social media

असं झालं प्रसाद-अमृताचं शाही लग्न, लेकाला मंडपात पाहून हर्षदा खानविलकरांचा आनंद गगनात मावेना, म्हणाल्या, “सूनबाई…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.