शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तमन्ना भाटिया व विजय वर्मा लवकरच अडकणार विवाहबंधनात?, आई-वडिलांच्या दबावामुळे घेतला निर्णय कारण

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 16, 2023 | 5:17 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Tamannah and vijay going to married soon

Tamannah and vijay going to married soon

बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा व अभिनेत्री तमन्ना भाटिया यांची लवस्टोरी काही लपून राहिलेली नाही. बऱ्याचदा हे दोघं एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात. या वर्षाच्या सुरुवातीला तमन्ना व विजय हे ‘लस्ट स्टोरीज २’ या बेवसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यामधील या दोघांची केमेस्ट्री प्रेक्षकांना बरीच पसंत पडली. या सीरिजनंतर त्यांच्या नात्याबाबत बऱ्याच चर्चा सुरु झाल्या होत्या. आता हे दोघं लवकरच त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहेत. लवकरच हे दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. (Tamannah and vijay going to married soon)

‘तेलुगु सिनेमा’च्या रिपोर्टनुसार, तमन्ना व विजय लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी आता गंभीरपणे विचार करत असल्याचं समोर येत आहे. याचं कारण म्हणजे रिपोर्टमध्ये पुढे सांगण्यात आलं की, तमन्नावर लग्नासाठी घरातून तिच्या आई-वडिलांचा दबाव असल्याचं बोललं जात आहे. यात हा पण दावा केला जात आहे की, ‘जेलर’ चित्रपटातील गाण्यात तमन्ना दिसल्यानंतर तिने पुढे कोणताच नवा चित्रपट साईन केलेला नाही. लग्नाविषयी अद्याप त्या दोघांकडून कोणत्याही प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. पण याचवर्षी दिलेल्या एका मुलाखतीत तमन्नाने लग्नाबाबत तिचे विचार मांडले होते. याबाबत बोलताना ती म्हणाली, “लग्न ही खूप मोठी जबाबदारी आहे. कोणत्याही व्यक्तीने ही जबाबदारी तेव्हाच घ्यावी जेव्हा त्यासाठी आपण तयार असू”.

View this post on Instagram

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)

आणखी वाचा – नवऱ्याने ५०वं शतक झळकावल्यानंतर अनुष्का शर्माचा आनंद गगनात मावेना, पोस्ट शेअर करत म्हणाली, “तू देवाचा…

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या एक मुलाखतीत ३३ वर्षीय तमन्नाने हे स्पष्ट केलं होतं की जेव्हा तिने १८ वर्षापूर्वी तिच्या करिअरची सुरुवात केली होती. तेव्हा तिला असं वाटलं होतं की ती या इंडस्ट्रीत ८ ते १० वर्षेच टिकून राहू शकेल. त्यानंतर पुढे तिने ३० वर्षानंतर लग्न करून २ मुलांची आई झालेली असेल.याबाबत सांगताना तमन्ना म्हणाली, “जेव्हा मी बऱ्याच वर्षांपूर्वी काम सुरु केलं होतं तेव्हा मला बऱ्याच गोष्टी वाटायच्या. त्यातली एक म्हणजे अभिनेत्रीचं करिअर केवळ ८ ते १० वर्षेच असतं. त्यामुळे मी माझ्या आयुष्याचा हिशोब घातला होते की वयाच्या ३० वर्षापर्यंत मी काम करणं बंद करेन. त्यानंतर माझं लग्न झालेलं असेल मला दोन मुलंही असतील. मुळात मी माझ्या आयुष्यातील वयाच्या ३० वर्षांनंतरचं नियोजन केलंच नव्हतं. त्यामुळे जेव्हा मी वास्तविक आयुष्यात ३० वर्षांची झाले, तेव्हा मला कळलं की मी तर आताच जन्माला आले आहे. ही संकल्पना माझ्यासाठी पुनर्जन्मासारखीच होती. त्यानंतर मला अगदी नव्याने जन्माला आलेल्या मुलासारखं वाटायला लागलं”.

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

आणखी वाचा – प्रसाद जवादे-अमृता देशमुखच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, अभिनेत्रीच्या ज्वेलरी डिझाईनने वेधलं लक्ष

लग्नाच्या विषयी सांगताना तमन्ना म्हणाली,  “मला असं वाटतं जेव्हा आपल्याला लग्न करण्याची इच्छा होईल तेव्हा आपण लग्न करायचं. लग्न एक खूप मोठी जबाबदारी आहे. हे कोणतंही सेलिब्रेशन नाही आहे. यातही खूप मेहनत असते. जसं आपण एखादं झाडं मोठं करतो, पाळिव प्राण्याला पाळतो किंवा जसं मुलाला जन्म देणं हे एक काम आहे. त्यामुळे जेव्हा आपण अशा जबाबदारीसाठी तयार असू तेव्हा नक्कीच लग्न करायला हरकत नाही. वेळ आली आहे किंवा सगळेच लग्न करत आहेत म्हणून तुम्ही लग्न करावं असं काही नाही”, असं स्पष्ट करत तिने तिचं लग्नाबाबातचं मतं मांडलं होतं. आता हे दोघं लग्नबंधनात कधी अडकणार?, याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.  

Tags: bollywood actorbollywood actressmarried soontamannaah Bhatiavijay Varma
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
virat kohli and rahul vaidya fight
Entertainment

विराट कोहलीला डिवचनं राहुल वैद्यला पडलं महागात, क्रिकेटरच्या भावाने सुनावलं, म्हणाला, “मूर्ख, फॉलोवर्स वाढवण्यासाठी…”

मे 9, 2025 | 12:30 pm
soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Next Post
Mahesh Babu to fund 40 students for remembrance of his father

अभिनेता महेश बाबूने वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त घेतला मोठा निर्णय, वाचून तुम्ही कराल त्याचं कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.