दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता महेश बाबू त्याच्या स्टाईल व अभिनयासाठी विशेष ओळखला जातो. बालकलाकार म्हणून पुढे आलेल्या या अभिनेत्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट केले. तो जितका त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आला, तितकाच त्याच्या वक्तव्य आणि कार्यक्रमांमुळे बराच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी अभिनेत्याने बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्यावर एक वक्तव्य केलं होतं, जे वादाच्या भोवऱ्यात आलं होतं. पण आता हा अभिनेता एका चांगल्या कारणासाठी चर्चेत आला आहे. (Mahesh Babu to fund 40 students for remembrance of his father)
महेश बाबूचे वडील व दाक्षिणात्य सिनेविश्वातील दिग्गज अभिनेते कृष्णा यांच्या निधनाला काल एक वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कुटुंबियांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले, ज्यात अभिनेत्याच्या जवळच्या लोकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर लोकांनी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्याची पत्नी नम्रता शिरोडकर, त्याच्या बहिणी व इतर नातेवाईक उपस्थित होते. या कार्यक्रमात अभिनेत्याने त्याच्या सामाजिक संस्थेमार्फत सुपरस्टार कृष्णा एजुकेशनल फंडची सुरुवात केली. ज्यात ४० गरजू विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. ही शिष्यवृत्ती शालेय शिक्षणापासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत असणार आहे. या उपक्रमाची माहिती नम्रता शिरोडकर हिने सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
हे देखील वाचा – “मर्सिडीज घ्यायची ना”, नव्या कारवरुन मिताली मयेकरला ट्रोल करणाऱ्याशी चाहत्यांनी घातला वाद, अभिनेत्री भडकली, म्हणाली, “तुमचा गोंधळ…”
अभिनयाबरोबरच सामाजिक कार्यात पुढे असणाऱ्या महेशने नम्रता शिरोडकरसह २०२० मध्ये त्याच्या नावाने एका सामाजिक संस्थेची स्थापना केली. ही संस्था विशेषतः हृदयविकाराशी संबंधित त्रस्त असलेल्या मुलांच्या आर्थिक मदती पुरवते. त्याचबरोबर, लहान मुलांसाठी विशेष आरोग्य शिबिर आयोजित करते. दरम्यान, कोरोना लॉकडाऊन काळातही या संस्थेने विशेष काम केलं होतं. दरम्यान, अभिनेत्याने घेतलेल्या या निर्णयाचं चाहत्यांनी स्वागत केलं आहे.
हे देखील वाचा – “भांडी घासली, बेसिनही साफ केलं अन्…”, ‘केबीसी’च्या मंचावर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, म्हणाले, “बाथरुमचं…”
महेश बाबू सध्या त्याचा ‘गुंटूर करम’ चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. त्रिविक्रम दिग्दर्शित या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला असून पुढील वर्षीच्या संक्रांतीला तो देशभरात प्रदर्शित होईल. तसेच, या चित्रपटानंतर तो एसएस राजामौली यांच्या आगामी चित्रपटात काम करणार असल्याचं बोललं जात आहे.