शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बाबासाहेब तुम्ही म्हणालात…”, शिंदे कुटुंबियांनी पंढरपुरात सुरु केला नाव व्यवसाय, म्हणाले, “आता विषय…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 13, 2023 | 10:22 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shinde Family started new Business

"बाबासाहेब तुम्ही म्हणालात…", शिंदे कुटुंबियांनी पंढरपुरात सुरु केला नाव व्यवसाय, म्हणाले, "आता विषय…"

मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी सध्या अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त विविध क्षेत्रांमध्ये आपलं नशीब अजमावत आहे. काही कलाकार हॉटेल व्यवसायात उतरले आहेत. तर काहींचा स्वतःच्या साड्यांचा, कपड्यांचा ब्रँड्स आहे. आता यामध्ये एका प्रसिद्ध कलाकाराचा समावेश झाला आहे. तो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमातून प्रसिद्ध झालेला अभिनेता व गायक उत्कर्ष शिंदे. पेशाने डॉक्टर असलेल्या उत्कर्षने वडील व भाऊ यांच्याप्रमाणे संगीत क्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. (Shinde Family started new Business)

उत्कर्षचे वडील आनंद शिंदे आणि भाऊ आदर्श शिंदे हे मराठी संगीत क्षेत्रातील ओळखीचं नाव. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी त्यांच्या गाण्यांनी रसिक प्रेक्षकांना अनेकदा ठेका धरायला लावला. लोकसंगीताचा वारसा लाभलेल्या या कुटुंबाचे राज्यासह देशभरात मोठा चाहतावर्ग आहे. स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचा वारसा चालवणारी शिंदे घराण्याच्या या चौथ्या पिढीने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नवीन उद्योग सुरु केला आहे. शिंदे कुटुंबीयांनी उद्योग क्षेत्रात पदार्पण केले असून पंढरपूर येथे त्यांनी स्वतःचं पेट्रोलपंप सुरु केला आहे. उत्कर्षने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे.

शिंदे कुटुंबाच्या या नवीन व्यवसायाला ‘आदर्श आनंद शिंदे पेट्रोलियम’ असं नाव देण्यात आलेलं असून याचे फोटोज नुकतेच समोर आले. या फोटोमध्ये वडील आनंद शिंदे या पेट्रोलपंपाची पूजा करत आहेत. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलं आदर्श, उत्कर्ष आणि हर्षद उपस्थित होते. उत्कर्षने हे फोटोज शेअर करत एक सविस्तर पोस्ट लिहिली. ज्यात तो म्हणाला, “छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णा भाऊ साठे ते अन्य महात्म्यांच्या विचाराना आदर्श मानले म्हणूनच आमचा उत्कर्ष होत आहे”. बाबासाहेब तुम्ही म्हणालात, शिका! आम्ही गायक, डॉक्टर, इंजिनिअर झालो. तुम्ही म्हणालात संघटित व्हा! संघर्ष करा! तर आम्ही एक कुटुंब राहून प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत पुढे सरसावलो.”

हे देखील वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम यांच्या घरी यंदा दिवाळी उत्साहात, नातवाला उटणं लावताचा व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Dr Utkarsh Anand Shinde (@utkarshshindeofficial)

पुढे तो म्हणतो, “रस्त्यावर भजन गाणारी एक पिढी, मंदिरात देवाला जागवणारी दुसरी पिढी, लोकसंगीतातून महाराष्ट्राला सण साजरे करताना नाचवणारी तिसरी पिढी ते आज चित्रपटातून सर्वांच्या गळ्याचे ताईत होणारी चौथी पिढी. न थकता, न थांबता फक्त कामाला प्रेम करणारे महामानवांच्या विचारांचे पाईक होऊन ‘तूच हो तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या ब्रीदवाक्याला सैदव मनात कोरून काम करणारे आमचे शिंदे कुटुंब. भजन, कवाली, गायन, चित्रपट गीते, आता चित्रपटात अभिनेता. डॉक्टर, डिग्री दवाखाने ते आता उद्योगजगात पदार्पण करत शिंदे परिवाराचं पाहिलं पेट्रोल पंप वेळापूर(पंढरपुर) येथे सुरू झालं. आता विषय पंपावर!”

हे देखील वाचा – “चिपळूणचा निवाजुद्दीन सिद्दीकी…”, अभिनेत्रीबरोबर प्रभाकर मोरेंचा रोमँटिक डान्स पाहुन नेटकऱ्यांच्या कमेंट, म्हणाले, “या वयात…”

“छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णा भाऊ साठे ते अन्य महात्म्यांच्या विचाराना आदर्श मानले म्हणूनच आमचा उत्कर्ष होत आहे. रसिक मायबापाने भरभरून प्रेम दिले, त्या प्रेमाची परतफेड आम्हाला कधीच करता येणार नाही. आम्ही हर्षद, आदर्श, उत्कर्ष असेच मेहनत करत राहू. पण त्याला साथ हवी तुमच्या आशिर्वादाची. क्यूकी… “ज़िंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तेहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर ज़मीन हमने, अभी तो सारा आसमान बाकी है.”, असं तो या पोस्टमध्ये म्हणाला. उत्कर्षची ही पोस्ट व्हायरल होताच चाहत्यांनी त्यांच्या कुटुंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव केला.

Tags: Adarsh Shindeanand shindemarathi singersShinde Family started new Businessutkarsh shinde
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Vanita Kharat On Her First Diwali

"दिव्यांची आरास, पारंपरिक लूक अन्…", वनिता खरात व सुमित लोंढेची लग्नानंतरची पहिली दिवाळी, चाहते म्हणाले, "लक्ष्मी नारायणाचा जोडा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.