महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमातील कलाकारांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. या कलाकारांचा हटके अंदाज प्रेक्षकांना खूपच आवडताना दिसतो. त्यांची विनोदी शैली सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत असते. अशाच आपल्या विनोदीशैलीतून सगळ्यांना खळखळून हसविणारे अभिनेते म्हणजे प्रभाकर मोरे. प्रभाकर यांनी मंचावर साकारलेलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलं वाटतं. ते सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. कधी कुटुंबासह तर कधी त्यांच्या सहकाऱ्यांसह विविध गाण्यावर रिल्स बनवताना दिसतात. (Prabhakar more romantic dance video)
विविध गाण्यावर विनोदी व्हिडीओ, डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर बरेच व्हायरलही झाले आहेत. या व्हिडीओंवर चाहत्यांकडूनही बरंच प्रेम मिळत असतं. आताही त्यांनी अभिनेत्रीसह रोमँटिक अंदाजातील डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. नुकताच प्रभाकर यांनी ‘तेरे वास्ते’ या गाण्यावर डान्स करत व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत ते पांढऱ्या रंगाच्या कपड्यात व त्यावर कलरफुल शर्टात दिसत आहेत. प्रभाकर डोळ्याला पिवळ्या रंगाचा चष्मा व पायात पांढऱ्या रंगाचे शूज घालून अगदी वेस्टर्न अंदाजात दिसत आहेत.
त्याचा हा लूक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. तर त्यांच्याबरोबर असलेली अभिनेत्री ही जांभळ्या रंगाच्या वनपीसमध्ये दिसत आहे. या दोघांचा हा रोमँटिक अंदाजातील डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होताना दिसत आहे.नेटकऱ्यांनीही लाईक व कमेंट करत त्यांच्या व्हिडीओचं कौतुक केलं आहे.

तर काहींनी मजेशीर अंदाजात ट्रोलही करत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट केली की, ‘चिपळूणचा नवाजुद्दीन सिद्दीकी’, असं लिहिलं आहे, तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहीलं की, ‘सायबानु दिवाली जोरात आहे’. तर काहींनी विनोदी अंदाजात ट्रोलही केलं आहे. त्यात एकाने ‘याला म्हणतात म्हातारचाळे’, असं लिहीत हसण्याचा इमोजी पाठवला आहे तर दुसऱ्याने, ‘जरा जपून या वयात अंगाची हाड जुळत नाही…बरं का…’, असं लिहीत ट्रोल केलं आहे.