मराठी अभिनेत्री प्रिया बापट हिने तिच्या उत्तम अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहे. नाटक, मालिका व चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत तिने प्रेक्षकांना आपलंसं केलं. शिवाय ओटीटी वेबसीरिज मधूनही तिच्या अभिनयाची झलक सातासमुद्रापार पोहोचली. प्रियाने अभिनयाबरोबरच आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं असून तिच्या विविध फोटोशूटची सतत चर्चा होत असते. मध्यंतरी, प्रियाला बिकीनी फोटोशूटमुळे जोरदार ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. त्यावर ती कमेंट्सद्वारे ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत असते. अशातच अभिनेत्रीची सोशल मीडियावरील एक पोस्ट सध्या चर्चेत येत आहे. (Priya bapat asked a question to fans)
नुकतंच दिवाळी सणाला सुरुवात झाली असून सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी आकाश कंदील व विद्युत रोषणाई पाहायला मिळते. त्याचबरोबर, फटाक्यांच्या अतिषबाजीला देखील सुरुवात झाली आहे. तर काही बाजारपेठांमध्ये कपडे व विविध साहित्यांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होत असल्याचं दिसत आहे. सध्या सर्वच बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे आकाश कंदील उपलब्ध आहे. पण बहुतांश ठिकाणी कागदाचे आकाश कंदील मिळत नसल्याबद्दल प्रियाने सोशल मीडियाद्वारे आपली खंत व्यक्त केली.
हे देखील वाचा – दिवाळीनिमित्त ऐश्वर्या नारकरांनी फराळ बनवताच नवऱ्याच्या कमेंटने वेधलं लक्ष, म्हणाले, “ऐश्वर्याच्या हातचं म्हणजे…”
प्रियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली. ज्यामध्ये तिने बाजारात पारंपरिक कागदाचे आकाश कंदील न मिळण्याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. तसेच यावेळी तिने चाहत्यांनाही एक प्रश्न विचारला. ती यामध्ये म्हणते, “प्लास्टिकचे आकाश कंदील बघून कंटाळा आला. आपले पारंपारिक कागदाचे आकाश कंदील सहजासहजी मिळतच नाहीत. मोजक्याच ठिकाणी मिळतात. तुम्हाला कोणता कंदील आवडतो? पारंपारिक कागदी कंदील की कोणताही कंदील.” तिच्या या पोस्टवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहे.
हे देखील वाचा – “तोच तोच पाणचटपणा…”, नाटकावरुन प्रशांत दामलेंना नेटकऱ्याने सुनावलं, म्हणाले, “अहो दामले…”

प्रिया सध्या पती उमेश कामतसह ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाचे विविध शहरांमध्ये दौरे करत आहे. काही दिवसांपूर्वी प्रिया परदेशात गेली होती. त्यावेळेस तिने उमेशबरोबर तिच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. या दौऱ्यादरम्यान केलेल्या बिकीनी फोटोशूटमुळे ती चांगलीच ट्रोल झाली होती. असं असलं तरी तिच्या विविध पोस्टची नेहमीच चर्चा होत असते.