अभिनेते प्रशांत दामले यांनी रंगभूमीचा एक काळ चांगलाच गाजवला. रंगभूमीचा बादशाह म्हणून प्रशांत दामले यांनी स्वतःची अशी ओळख निर्माण केली. अनेक नाटकांमध्ये दामले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. नाट्य कलावंत प्रशांत दामले यांनी आजवर सुमारे ३२ नाटकांचे तब्बल १२ हजार पाचशेंहून अधिक प्रयोग केले, जो एक विक्रम मानला जातो. केवळ अभिनयच नाही तर नाट्यनिर्मिती क्षेत्रातही त्यांनी उरर्म भूमिका निभावली आहे. (Prashant Damle Troll)
तब्बल तीन दशकांहून अधिक काळ रंगभूमीला वाहून घेणारे प्रशांत दामले यांनी मराठी नाट्यसृष्टीत मोठा चाहतावर्ग तयार करून कलावंत म्हणून प्रसिद्धीस आले. सोशल मीडियावरही प्रशांत दामले बऱ्यापैकी सक्रिय असतात. प्रशांत दामले यांनी नुकताच त्यांच्या रंगभूमीवरील कारकिर्दीतील १२ हजार ८०० नाट्यप्रयोगांचा टप्पा पार केला. ही आकडेवारी दर्शवत त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांनी ‘चार दिवस प्रेमाचे’ या नाटकांची एक छोटीशी झलक व्हिडिओद्वारे शेअर केली होती. ही खास पोस्ट त्यांनी चाहत्यांसाठी शेअर केली.
प्रशांत दामले यांनी फेसबुकवर ‘चार दिवस प्रेमाचे’ या नाटकातील एक छोटीशी व्हिडीओ क्लिप शेअर केली. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या. तर त्यांच्या चाहत्यांनी कमेंट करत प्रशांत दामलेंच्या नाटकाबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. यावेळी एका नेटकऱ्याने केलेल्या कमेंटवर प्रशांत दामले यांनी उत्तर देत त्यांची बोलती बंद केली. नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “अहो दामले, तुमचं अभिनंदन आकडेवारी आहे म्हणून, पण दर्जा सुधारायला हवा. तोच तोच पाणचटपणा हसवत नाही हो.” त्यावर प्रशांत दामले यांनी उत्तर देत म्हटलं, “ओके”.

या नेटकऱ्याच्या प्रश्नावर दामलेंनी उत्तर दिलेलं पाहून त्यांच्या चाहत्यांनी दामलेंची बाजू घेत कमेंट केली. एका नेटकऱ्याने लिहिलं, “ओके काय दामले सर, त्यांना विनोदातलं कळत नसेल.” तर आणखी एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं की, “प्रशांत दामले सर कायतरी टेंशन असेल त्यांना, म्हणुन तुमचे विनोद पांचट वाटत असतील. ब्रह्मेश हर्डीकर काळजी करु नका, ही वेळही निघुन जाईल, धीर सोडु नका.”