९०च्या दशकातील अभिनेत्री व दिग्दर्शिका पूजा भट्ट ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकवेळा चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस ओटीटी २’ या कार्यक्रमातून छोट्या पडद्यावर पुनरागमन केले होते. ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शोमुळे ती चर्चेत आली होती. ‘बिग बॉस’ या शोमध्ये तिने तिच्या आयुष्याशी निगडीत अनेक रहस्यांचा उलगडा केला होता. यानंतर पुन्हा एकदा पूजाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. (Pooja Bhatt Opens Up On Her Failed Marriage And Battle With Alcohol)
पूजा ही नुकतीच ‘अनचेन माय हार्ट’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सहभागी झाली होती. या कार्यक्रमात तिने मनीष माखिजाबरोबरच्या मोडलेल्या लग्नापासून ते दारूच्या व्यसनापर्यंत सर्व गोष्टींबद्दल खुलेपणाने बोलली. यात पूजाने असे म्हटले आहे की, “माझं लग्न तुटत चाललं आहे हे मला जाणवत होतं. मात्र हे लग्न मोडण्यासाठी कुठलेच ठोस कारण नव्हते. पण त्या नात्यात राहण्याचा मला कंटाळा आला होता. आम्ही दोघांनीही एकमेकांची फसवणूक केली नाही. पण आमचे एकमेकांमधील स्वारस्य कमी होत गेले”.
आणखी वाचा – मराठी कलाकारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून खास गिफ्ट, शेअर केले फोटो, भेटवस्तूमध्ये नेमकं काय आहे?
यापुढे ती असं म्हणली की, “एक स्त्री म्हणून समाजाने ठरवून दिलेल्या चौकटीत राहून मी स्वतःला हरवून बसले होते. काही काळानंतर मला समजले की, मी एका अश्या बंधनात अडकले आहे ज्यात मी माझं अस्तित्वचं हरवलं आहे. मी कोण आहे? हे मी विसरून गेले होते. मनीष खूप चांगला माणूस आहे. तरीही मला या नात्यात एकटं एकटं वाटत होतं”.
या दरम्यान बोलताना पूजाने तिची दारूच्या व्यसनातून कशी सुटका झाली हे देखील तिने सांगितले. याबद्दल बोलताना पूजा म्हणाली की, “मी यातून बाहेर पडण्यासाठी दारूचा साधन म्हणून वापर केला. मी आधी चांगली पत्नी बनण्यात आणि नंतर दारूच्या बाटलीत माझा आनंद शोधला. दारूच्या बाटलीत व नात्यात काय फरक आहे, असा प्रश्नही मी स्वतःला विचारला होता. पण मी माझे दु:ख व वेदना कमी करण्यासाठी दारूचा वापर केला होता”.
यापुढे पूजा म्हणाली की, “मी माझ्या वेदनांशी व एकटेपणाशी स्वत: लढायला शिकले”. तसेच तिला तिच्या या कठीण काळातून आणि दारूच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी ७ वर्षे लागली, असल्याचे देखील तिने कबूल केले.