शनिवार, सप्टेंबर 12, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मोडलेलं लग्न ते दारूचे व्यसन…; अभिनेत्री पूजा भट्टचा वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा, म्हणाली, “या नात्यात राहण्याचा मला…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 9, 2023 | 5:14 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
actress pooja bhatt opens up on her failed marriage with manish makhija and battle with alcohol

मोडलेलं लग्न ते दारूचे व्यसन...; अभिनेत्री पूजा भट्टचा वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा, म्हणाली, "या नात्यात राहण्याचा मला..."

९०च्या दशकातील अभिनेत्री व दिग्दर्शिका पूजा भट्ट ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकवेळा चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस ओटीटी २’ या कार्यक्रमातून छोट्या पडद्यावर पुनरागमन केले होते. ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शोमुळे ती चर्चेत आली होती. ‘बिग बॉस’ या शोमध्ये तिने तिच्या आयुष्याशी निगडीत अनेक रहस्यांचा उलगडा केला होता. यानंतर पुन्हा एकदा पूजाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. (Pooja Bhatt Opens Up On Her Failed Marriage And Battle With Alcohol)

पूजा ही नुकतीच ‘अनचेन माय हार्ट’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सहभागी झाली होती. या कार्यक्रमात तिने मनीष माखिजाबरोबरच्या मोडलेल्या लग्नापासून ते दारूच्या व्यसनापर्यंत सर्व गोष्टींबद्दल खुलेपणाने बोलली. यात पूजाने असे म्हटले आहे की, “माझं लग्न तुटत चाललं आहे हे मला जाणवत होतं. मात्र हे लग्न मोडण्यासाठी कुठलेच ठोस कारण नव्हते. पण त्या नात्यात राहण्याचा मला कंटाळा आला होता. आम्ही दोघांनीही एकमेकांची फसवणूक केली नाही. पण आमचे एकमेकांमधील स्वारस्य कमी होत गेले”.

आणखी वाचा – मराठी कलाकारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून खास गिफ्ट, शेअर केले फोटो, भेटवस्तूमध्ये नेमकं काय आहे?

यापुढे ती असं म्हणली की, “एक स्त्री म्हणून समाजाने ठरवून दिलेल्या चौकटीत राहून मी स्वतःला हरवून बसले होते. काही काळानंतर मला समजले की, मी एका अश्या बंधनात अडकले आहे ज्यात मी माझं अस्तित्वचं हरवलं आहे. मी कोण आहे? हे मी विसरून गेले होते. मनीष खूप चांगला माणूस आहे. तरीही मला या नात्यात एकटं एकटं वाटत होतं”.

आणखी वाचा – “दोन रुपये नाहीत हिच्याकडे आणि…”, भरगर्दीत सायरा बानूंना भलतंच बोलून गेले होते भरत जाधव, म्हणाले, “ही कसली नटी…”

या दरम्यान बोलताना पूजाने तिची दारूच्या व्यसनातून कशी सुटका झाली हे देखील तिने सांगितले. याबद्दल बोलताना पूजा म्हणाली की, “मी यातून बाहेर पडण्यासाठी दारूचा साधन म्हणून वापर केला. मी आधी चांगली पत्नी बनण्यात आणि नंतर दारूच्या बाटलीत माझा आनंद शोधला. दारूच्या बाटलीत व नात्यात काय फरक आहे, असा प्रश्नही मी स्वतःला विचारला होता. पण मी माझे दु:ख व वेदना कमी करण्यासाठी दारूचा वापर केला होता”.

यापुढे पूजा म्हणाली की, “मी माझ्या वेदनांशी व एकटेपणाशी स्वत: लढायला शिकले”. तसेच तिला तिच्या या कठीण काळातून आणि दारूच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी ७ वर्षे लागली, असल्याचे देखील तिने कबूल केले.

Tags: bollywoodbollywood actressentertainmentPooja bhatt
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aali Mothi Shahani Ganesh Vandana
Entertainment

बाप्पाच्या भक्तीत रंगणार ‘आली मोठी शहाणी’ मधील ‘गणेश वंदना’,

सप्टेंबर 12, 2026 | 10:16 am
Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Next Post
Bigg Boss 17 wild card entry

Bigg Boss 17 : 'बिग बॉस'मध्ये नव्या सदस्याची एण्ट्री होणार, मोठा ट्विस्ट, घरातल्या स्पर्धकाचीच पत्नी स्पर्धक म्हणून येणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.