शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णीची लगीनघाई; सुकन्या मोने, सुबोध भावेच्या पत्नीने केलं पहिलं केळवण, सुंदर सजावट अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 9, 2023 | 11:11 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Swanandi And Ashish Kelvan

स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णीची लगीनघाई; सुकन्या मोने, सुबोध भावेच्या पत्नीने केलं पाहिलं केळवण, सुंदर सजावट अन्…

अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी या दोघांनी ‘आमचं ठरलं’ म्हणत एकत्र फोटो पोस्ट करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. स्वानंदीने मालिकाविश्वातून प्रेक्षकांच्या मनात घर केलं, तर आशिषने अनेक रिऍलिटी शो मधून आपल्या आवाजाच्या जादूने चाहत्यांची मन जिंकली. स्वानंदी व आशिष यांनी त्यांच्या नात्याची जाहीरपणे कबुली देत प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काचं दिला. त्यानंतर दोघांनी जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा सोहळा उरकला. (Swanandi And Ashish Kelvan)

स्वानंदी व आशिषच्या साखरपुडा सोहळ्याचे अनेक फोटोस सोशल मीडियावरून बरेच व्हायरल झाले होते. त्यावेळी स्वानंदीने इंस्टाग्राम अकाउंटवरून लवकरच आम्ही लग्न करणार आहोत अशी पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. स्वानंदी व आशिष यांची ही लगीघाई सुरु झालेली पाहायला मिळतेय. त्यांच्या लग्नाच्या आधी हे दोघेही केळवणासाठीही सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत. नुकतेच त्यांचे काही केळवणाचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा – ‘त्या’ बनावट व्हिडीओ प्रकरणानंतर सुवर्ण मंदिरात पोहोचली उर्फी जावेद, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by Swanandi ???? (@swananditikekar)

स्वानंदीने ‘अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई’ या मालिकेत अभिनेत्री सुकन्या मोने यांच्यासह काम केले होते. या मालिकेच्या संपूर्ण टीमने एकत्र येत स्वानंदी व आशिषचं केळवण केलं आहे. याचे फोटो स्वानंदीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंसह कॅप्शन देत स्वानंदी म्हणाली आहे की, “हे पहिलं केळवण होतं, आता लाईन लागलीचं.” असं म्हणत तिने सर्वांचे आभार मानले आहेत. स्वानंदीच्या पहिल्या केळवणाचे हे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहेत.

आणखी वाचा – Video : “गर्भवती महिलांनी…”, ‘त्या’ फोटोशूटमुळे ट्रोल करणाऱ्यांना रुबिना दिलैकचे सडेतोड उत्तर, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “खूपच त्रासदायक…”

स्वानंदीने मालिकाविश्वातून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहेच, तर आशिषने अनेक रिऍलिटी शो मधून आपल्या आवाजाच्या जादूने चाहत्यांची मन जिंकली आहेत. स्वानंदी छोट्या पडद्यावर जितकी सक्रिय असते तितकीच तिला गायनाची आवड देखील आहे, हे सर्वांनाच माहित आहे. तर आशिषने त्याच्या गायनातून ‘सारेगमप’, ‘इंडियन आयडॉल’ हे रिऍलिटी शो गाजवले आहेत.

Tags: ashish kulkarnientertainmentsukanya moneswanandi tikekarswanandi tikekar and ashish kulkarni kelvan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Sara ali khan talks her breakup with kartik aryan

"या नात्यात…", कार्तिक आर्यनबरोबर ब्रेकअपबद्दल सारा अली खानचा मोठा खुलासा, म्हणाली, "तुम्ही या इंडस्ट्रीत…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.